शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये पंधरवड्यात १२ पर्यटकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:10 IST

जयंत धुळप  अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच माहितीच्या नसलेल्या पाण्याच्या जलाशय आणि धबधब्याच्या ठिकाणी जाताना स्थानिकांकडून माहिती न ...

जयंत धुळप  अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच माहितीच्या नसलेल्या पाण्याच्या जलाशय आणि धबधब्याच्या ठिकाणी जाताना स्थानिकांकडून माहिती न घेणे आणि अनेकदा स्थानिकांनी सांगून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे अपघाती मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई-पुण्यातून आलेल्या पर्यटक व युवकांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.पर्यटक आणि विशेषत: बुडून मृत्यू होण्याच्या या समस्येला आळा घालण्याकरिता प्रत्येकवेळी पोलिसांना वा सरकारी यंत्रणेला जबाबदार धरणे योग्य नाही. मुळात येणाºया पर्यटकांनी आत्मसंयम ठेवणे आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेकरिता अत्यावश्यक आहे, असे मत या निमित्ताने ‘चला मुलांना घडवू या’ या बालक-पालक प्रबोधन उपक्रमाचे प्रणेते व ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. मुंबई-पुण्यातील महाविद्यालयातील अनेक मुले-मुली आपल्या पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता रायगड किल्ला, रायगडमधील अन्य पर्यटन स्थळे आणि विशेषत: समुद्र किनारी येत असतात. अशा मुला-मुलींचे देखील अपघाती मृत्यू झाल्याचे अनेक प्रसंग आहेत. अशा वेळी दोष कुणाचा, त्या मुलांच्या पालकांचा, सरकारी यंत्रणेचा की पोलिसांचा असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु या तिघांपैकी दोष कुणाचाही नसतो, आयुष्याचे नुकसान मात्र त्यांचे स्वत:चेच होते. यातून स्वसुरक्षेचा विचार युवक-युवतींनी गांभीर्याने करणे अनिवार्य असल्याचेही डॉ.दाभाडकर यांनी नमूद केले. मद्यप्राशन करून समुद्रात पोहायला गेल्यावर बुडून मृत्यू झाल्याचीही उदाहरणे जिल्ह्याच्या किनारपट्टीत घडली आहेत. या समस्येला आळा घालणे कायद्याने शक्य नाही. त्याकरिता आत्मसंयम आवश्यक आहे, तो पर्यटनाकरिता आलेल्या गटातील एकानेजरी विचारात घेतला तरी असे दुर्धर प्रसंग ओढावणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.पोलिसांना न जुमानता चालते मस्तीअलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी विशेष आणि मोबाइल पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करतात. अलिबाग, वरसोली आदि समुद्रकिनारी भरती ओहोटीच्या वेळा दर्शविणारे फलक देखील लावण्यात आले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक पर्यटक समुद्रात ओहोटीच्या वेळी पोहण्याकरिता जातात आणि मग काही वेळेस दुर्घटना घडते. समुद्र किनाºयावरील स्थानिक नागरिक वा छोटे व्यावसायिक आवर्जून समुद्राच्या भरती-ओहोटीबाबत सूचना करतात, परंतु त्या नाकारून समुद्रात जाणाºया पर्यटकांना कसे आवरायचे असा प्रश्न तेथे कार्यरत पोलीस कर्मचाºयांना असतो, असे वराडे यांनी सांगितले. दोन दिवसांत कर्जत तालुक्यात वर्षासहलीसाठी येणाºया पाच पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे तर महिन्याभरात कर्जत तालुक्यात धरण, धबधबा, आणि ट्रेकिं साठी येणाºया एकूण नऊ जणांचे बळी गेले आहे. धबधब्यावर, समुद्रकिनारी, धरणावर मौज, मज्जा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करु न ही तरु णाई सेल्फीच्या नादात अति उत्साहात जीव धोक्यात घालतात, यामुळे या घटनांमध्ये वाढ होत आहे.सुरक्षेकडे आणि प्रशासनाच्या सूचनांकडे पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत.