शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी काम करणाऱ्यांचा सत्कार

By admin | Updated: May 14, 2016 00:58 IST

शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या शबाना शेख, कर्ज काढून शौचालय उभारणाऱ्या शकुंतला साबळे आणि स्वत:चे शौचालय बांधून सबंध आदिवासी वाडी हागणदारीमुक्तीचा नारा देणारे

अलिबाग : शौचालय बांधण्यासाठी स्वत:चे मंगळसूत्र गहाण ठेवणाऱ्या शबाना शेख, कर्ज काढून शौचालय उभारणाऱ्या शकुंतला साबळे आणि स्वत:चे शौचालय बांधून सबंध आदिवासी वाडी हागणदारीमुक्तीचा नारा देणारे लहू वाघमारे यांनी स्वच्छ भारत मिशनसाठी आदर्श ठरावे असे कार्य केले आहे. त्यांचा सत्कार खालापूर पंचायत समितीच्या सभापती मालती खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०१६-१७ मध्ये हागणदारीमुक्त करावयाच्या २६ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे संपन्न झाली. तालुक्यातील स्वच्छतेचे काम अन्य तालुक्यांसाठी प्रेरणादायी आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामात गेल्या वर्षी खालापूर तालुका आघाडीवर राहिला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना सीएसआर खर्च करण्यास प्रवृत्त केले आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले. खालापूर तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी आपल्या प्रस्तावनेत केले.