शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना वाहिली अनोख्या पद्धतीने आदरांजली

By admin | Updated: March 4, 2017 16:31 IST

सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे राजकारणी वा नेते आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या समारंभाचे आयोजन करुन अमाप खर्च करण्याची प्रथा सुरू झाली आहे.

 ऑनलाइन लोकमत/जयंत धुळप 

अलिबाग, दि. 4 -  सध्याच्या काळात  सर्वसाधारणपणे राजकारणी वा नेते आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या समारंभाचे आयोजन करुन अमाप खर्च करण्याची प्रथा सुरू झाली आहे. पण, या परंपरेला छेद देणारी घटना अलिबाग येथे घडली आहे.  महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.अॅड.दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे (कोएसो )विद्यमान अध्यक्ष संजय पाटील यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करणारा उपक्रम राबवला आहे.  
 
गेल्या पाच वर्षापासून आपल्या स्वर्गीय पित्यांच्या वाढदिवशी स्वकष्टाच्या उत्पन्नातून 1 लाख 1 हजार रुपयांची भौतिक सुविधा विकास निधी कोकण एज्युकेशन सोयायटीच्या एका शाळेस देण्याची आदर्शवत आगळीवेगळी परंपरा त्यांनी निर्माण केली आहे. 
यंदा स्व.अॅड.दत्ता पाटील यांच्या 91 व्या जयंती दिनी अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरला किणी यांना या निधीचा धनादेश 'कोएसो'चे नवीन संचालक सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.
 
स्व.अॅड.दत्ता पाटील यांना आदरांजली
कोकण एज्युकेशन सोयायटीच्या मुख्यालयात आयोजित या छोटेखानी कार्यक्रमात प्रथम कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय पाटील यांनी स्व.अॅड.दत्ता पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व  आदरांजली वाहिली. यावेळी कोकण एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह अजित शाह, जनता शिक्षण मंडळाच्या संचालक शारदा धुळप, कोएसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, कोएसो माध्यमिक शाळा प्रशासन अधिकारी कृष्णा म्हात्रे व अशोक गावडे, कोएसो प्राथमिक शाळा प्रशासन अधिकारी संजिवनी जोशी, कोएसो ईंग्रजी माध्यम शाळा प्रशासन अधिकारी अनिता पाटील व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 
 
शाळेला मुलभूत व भौतिक सुविधा विकास निधी
आयुष्यभर ग्रामीण विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विकासासाठी अथक परिश्रम घेणारे माझे पिता आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्व.अॅड.दत्ता पाटील अर्थात दादा यांनी, कोकणात व ग्रामीण भागात शैक्षणिक विकासाचे वास्तवात उतरवलेले स्वप्न, भविष्यात देखील ते अबाधित राखून त्याच मार्गावरुन पुढे जाताना पितृऋण उतराई होण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दादांच्या वाढदिवसानिमित्त मी सन 2012 या वर्षापासून कोकण एज्युकेशन सोसायटीला एका शाळेला मुलभूत, भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी रु 1 लाख 1 हजार रुपयांचा निधी माझ्या स्वकष्टार्जीत उत्पन्नातून देण्याचा संकल्प सुरु केला आहे. मी जिवंत असेपर्यंत माझा हा संकल्प मी अबाधित ठेवणार असल्याची भूमिका स्व.अॅड.दत्ता पाटील यांचे चिरंजीव आणि कोकण एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केली. 
 
संजय  पाटील यांच्या संकल्पानुसार भौतिक सुविधा विकास निधीचे यंदाचे सहावे वर्ष आहे. सन 2012 मध्ये कोएसो मांडला माध्यमिक शाळा (महाड), सन 2013 मध्ये कोएसो प्रभाकर पाटील मा.शाळा, काळसूरी (म्हसळा), सन 2014 मध्ये कोएसो गुरुदत्त माध्यमिक विद्यालय,वाकी (महाड), सन 2015 मध्ये कोएसो नारायण गायकर मा.शा.,वळके (मुरुड), सन 2016 मध्ये को.ए.सो. माध्यमिक शाळा, माणकुले (अलिबाग) तर यंदा या संकल्पांतर्गत को.ए.सो.धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा,परहूरपाडा(अलिबाग) या शाळेस रु. 1 लाख 1 हजाराचा निधी देण्यात आला आहे.