पनवेल : शेकापचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांचे वडील शंकरशेठ पाटील (८६) यांचे शुक्रवारी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उरण तालुक्यातील कासरभट हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. यामध्ये माजी आमदार विवेक पाटील, मनोहर पाटील, हेमंत पाटील ही तीन मुले तर शंकुतला वाजेकर ही मुलगी असा परिवार आहे. ज्येष्ठ समाजसेवक म्हणून परिचित शंकरशेठ हे गरीब मुलांना शिक्षणाासाठी कायम प्रयत्नशील होते. (प्रतिनिधी)
माजी आमदार विवेक पाटील यांना पितृशोक
By admin | Updated: January 14, 2017 07:01 IST