शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

एचपीसीएल गॅस पाइपलाइनविरोधात १४ मार्चपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 03:10 IST

गॅस लाइन लोकवस्तीऐवजी नदीकिना-यावरून किंवा गावाबाहेरून शासकीय जागेतून न्यावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर गावकरी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : उरण (भेंडखळ) ते शिक्रापूर-चाकण ही १६४ किलोमीटरची हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(एचपीसीएल) कंपनीची १२ इंच (एक फूट) व्यासाची एलपीजी गॅस पाइपलाइन ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी-खारपाडा हद्दीतील दुष्मी, ठाकूरपाडा व खारपाडा गावांतील लोकवस्तीतून बेकायदा पद्धतीने टाकण्याचे सुरू केलेले काम तत्काळ थांबवून ही गॅस लाइन लोकवस्तीऐवजी नदीकिना-यावरून किंवा गावाबाहेरून शासकीय जागेतून न्यावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा व गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर गावकरी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिली.ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी, खारपाडा आणि गॅस लाइन हटाव कृती समितीच्या वतीने ६ मार्च रोजी अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता, परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे बुधवारी १४ मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुरेश ठाकूर,जनीबाई ठाकूर, सतीश अंबाजी, हिरामण घरत, सचिन पाटील आदींसह दुष्मी ठाकूरपाडा गावांतील शेकडो ग्रामस्थ पेण प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे पत्र रायगडच्या जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.प्रमुख मागण्याएचपीसीएल गॅस पाइपलाइन दुष्मी, ठाकूरपाडा व खारपाडा गावांतील लोकवस्तीतून न टाकता पर्यायी म्हणजे पाताळगंगा नदी किनाºयामार्गे नेण्यात यावी.नियमबाह्य काम करणाºया एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे.गॅस लाइन खारपाडा-सावरोली राज्य मार्ग १०४ च्या मध्यापासून १५ मीटर अंतरापलीकडे टाकण्यात यावी असे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगीमध्ये स्पष्टपणे नमूद असताना, एचपीसीएल कंपनी व ठेकेदार रस्त्याच्या अगदी कडेला गॅस लाइन टाकत आहेत. या नियमबाह्य कामात पेण सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधितांना सहकार्य करीत आहे. त्यांच्यावर फसवणूक व कर्तव्यात कसूर केल्याचे गुन्हे दाखल करण्यात यावे.