शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 29, 2016 03:21 IST

राज्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये कोकणातील एकमेव खालापूर तालुक्याचा समावेश आहे. आजही तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

- अमोल पाटील,  खालापूरराज्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये कोकणातील एकमेव खालापूर तालुक्याचा समावेश आहे. आजही तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणे, नद्या उशाला मात्र कोरड घशाला अशीच केविलवाणी अवस्था येथील जनतेची पाण्यावाचून झाली आहे. २०१६ च्या उन्हाळ्यातील टंचाई कृती आराखड्यात २२ गावे, ३१ वाड्यांचा समावेश आहे. खालापूर तालुका हा कोकणातील आणि राज्यातील प्रगत तालुक्यांच्या यादीत समाविष्ट आहे. मुंबई-पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण खालापूर तालुका आहे. गेल्या काही दशकांत तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढल्याने दरडोई उत्पन्न वाढले आहे. औद्योगिकीकरणाला पुरेसे पाणी तालुक्यात उपलब्ध असल्याने तालुक्याच्या सर्वच भागांमध्ये कारखानदारी वाढली आहे. पाताळगंगा नदी, अंबा नदी, दोनवत, कलोते धरण, आटकरगाव, नदाल पाझर तलाव, मोरबेसारखा नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरण आदी लहान-मोठी धरणे तालुक्यात आहेत. मुबलक पाणी डोळ्यासमोरून वाहून जाते, तर पाण्याचा मोठा साठा डेड वॉटर म्हणून शिल्लक असूनही तालुक्यातील जनतेला पाण्यावाचून तडफड करावी लागत आहे. ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना राबविल्या, मात्र सर्वच जलधारा योजना अर्धवट अवस्थेत सुरू आहेत. त्या निकामी असल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड गेली अनेक वर्षे नागरिक करीत आहेत. तालुक्याच्या दोनवत येथे धरण आहे. मात्र दोनवत, किरखिंडीसह आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे, तर कमी पुरवठा आहे. ही वस्तुस्थिती गेली अनेक वर्षे कायम असल्याने उत्तम स्टीलसह गोदरेज आदी कंपन्यांनी पुढाकार घेऊन या गावांना पाणी देण्याविषयी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे. यासह सावरोली, देवनावे, खालापूर, वावोशी, माजगाव, माडप, नावंडे, सारसन, वढवल आदी गावांच्या हद्दीत वेगवेगळे कारखाने, गृहप्रकल्प, खासगी प्रकल्प सुरू आहेत. हे सर्वजण पाणी नदीपात्रातून उचलत असून, या सर्वांनी जॅकवेल नदीकिनारी उभ्या केल्या आहेत.पाइपलाइनद्वारे पाणी गावांच्या हद्दीतून वाहून नेले जात असल्याने या पाइपलाइनद्वारे काही अंशी पिण्यासाठी पाणी जर उपलब्ध करून दिले तर भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचाच निकालात निघेल. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या मास्टर प्लानबाबत पत्र मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक दर्गे यांनी खालापूर तहसीलदार यांना दिले आहे.पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन आम्ही योग्य त्या उपाययोजना करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे, त्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.पाण्याच्या बाबतीत शासन संवेदनशील आहे. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन सकारात्मक पाऊल उचलेल. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जे जे करणे शक्य आहे ते ते करण्याचा आमचा मानस असून, उद्योगांनी सामाजिक भावनेतून पाणी दिल्यास आम्ही स्वागत करू.-अजित नैराळे, तहसीलदार