शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

महामार्गावर शीघ्र प्रतिसाद व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 02:55 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. हे अपघात थांबविण्याकरिता रस्ते विकास महामंडळाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. हे अपघात थांबविण्याकरिता रस्ते विकास महामंडळाने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शीघ्र प्रतिसाद व्हॅनची (क्यूआरव्ही)व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे अपघातग्रस्तांना मोठा फायदा होत असून, अनेकांचे प्राण वाचविण्यातही यश मिळाले आहे. म्हणून क्यूआरव्ही खऱ्या अर्थाने जीवदायी ठरत आहे. साधारण १०० कि.मी लांबीच्या या द्रुतगती मार्गावरून तासी ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. मात्र ही वेगमर्यादा ओलांडली जात असल्याने टायर फुटणे, वाहनावरील ताबा सुटणे, दरीत वाहन कोसळणे, वळणाला अपघात होणे, अचानक गाडीला आग लागणे अशा घटना वारंवार घडतात. त्याचबरोबर ओव्हरटेकच्या नादात अवजड वाहनांचेही अपघात वाढले आहेत. रस्ते विकास महामंडळाने अपघात रोखण्याकरिता आपत्कालीन यंत्रणा विकसित केली आहे. आर्यन पंप या कंपनीच्या सहकार्याने महामंडळाने शीघ्र प्रतिसाद व्हॅन द्रुतगती महामार्गावर आणल्या आहेत. सुरुवातीला लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर पहिली व्हॅन सुरू करण्यात आली. घाटात होणाऱ्या अपघातस्थळी त्वरित पोचून बचाव करण्यास ही यंत्रणा यशस्वी ठरली. त्यामुळे आणखी तीन व्हॅन याच महामार्गावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये तळेगाव, खालापूर आणि पनवेलचा समावेश करण्यात आला आहे. व्हॅनवर प्रशिक्षित रेस्क्यू आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. खालापूर आणि लोणावळा येथील व्हॅनला अधिक कॉल येतात. तिथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य आर्यन पंपच्या पथकाने केले आहे. जवळपास १०० पेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवले आहेतच. त्याचबरोबर वाहतूक नियमन तसेच रहदारीस अडथळा होऊ नये याकरिता मदत केली आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर त्या विझविण्याकरिता व्हॅन सर्वात आधी पोहोचते.