शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ४७ कोटी रुपयांचे कर्ज होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 23:50 IST

गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून तर गेलाच; शिवाय शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच उभा होता.

आविष्कार देसाई अलिबाग : गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या हातून तर गेलाच; शिवाय शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर तसाच उभा होता. अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने तब्बल दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतीचे कर्ज माफ केले आहे. रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार शेतकºयांची ४६ कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम माफ करण्यात आली आहे. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यांत शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षांत शेतीनिगडित कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेला आहे. त्यांना शेतीकामांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगलाच मेटाकुटीला आला आहे. त्याला दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे.यासाठी प्रत्येक गावस्तरावर, तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर शेतकºयांच्या माहितीसाठी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. शिवाय राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या ठिकाणी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकºयांची फरफट टाळण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यातील शेतकरी कर्जाच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाने शेतकºयांना सर्वतोपरी सहकार्य करावे, अशा सूचना मध्यंतरी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.