शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन स्टार रिसॉर्टमुळे शेतकऱ्याचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2017 01:15 IST

कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरू आहे. या रिसॉर्ट मालकाने त्याच्या रिसॉर्टमधील संपूर्ण सांडपाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरू आहे. या रिसॉर्ट मालकाने त्याच्या रिसॉर्टमधील संपूर्ण सांडपाणी समोरील शेतकरी शहाजी ठाकरे यांच्या शेतात सोडल्याने आणि दारूच्या बाटल्या शेतात टाकल्याने या शेतकऱ्याची संपूर्ण शेती नापीक झाली आहे. अनेक वेळा या हॉटेल मालकाशी संपर्क करून हॉटेल मालक या शेतकऱ्याला दमदाटी करत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने नेरळ पोलीस ठाण्यात आणि कर्जत तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे.आसल ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून सेव्हन स्टार रिसॉर्ट सुरु आहे. या रिसॉर्टला लागून आसलमधील ग्रामस्थ शहाजी धोंडू ठाकरे यांची जमीन मिळकत आहे. या जमिनीत सेव्हन स्टार रिसॉर्ट मालकाने मनमानी करत आपल्या रिसॉर्टमधील सांडपाणी आणि दारूच्या बाटल्या त्यांच्या शेतात टाकल्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांची संपूर्ण जमीन नापीक झाली आहे. पावसाला सुरु वात झाली असल्याने आपल्या शेतात शेती कशी पिकवायची असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. या संदर्भात ठाकरे यांनी सेव्हन स्टार रिसॉर्टचे मालक आणि व्यवस्थापकांना अनेक वेळा या समस्येविषयी विचारणा केली असता त्यांना ते दमदाटी करत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या शेतकऱ्याच्या शेतात पाणी सोडताना त्यांनी कसल्याही प्रकारची विचारणा न करता आपल्या मनमानी पद्धतीने शेतात पाणी सोडून शेतकऱ्याची जमीन नापीक केली आहे. तसेच या रिसॉर्टमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यपान होत असून त्यानंतर रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या या शेतकऱ्याच्या शेतात आणून टाकत आहेत. तसेच या रिसॉर्टमुळे अनेक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शहाजी ठाकरे यांचा शेतीवरच उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु या रिसॉर्ट मालकाने त्यांची शेती पूर्ण नापीक केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात शेतकरी शहाजी ठाकरे यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आणि तहसीलदार कर्जत यांच्याकडे तक्र ार केली आहे. तरी लवकरात लवकर शेतातील दारूच्या बाटल्या आणि सोडलेले सांडपाणी काढून टाकावे आणि रिसॉर्ट मालकावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.