शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने पिकविले साडेतीन किलोचे रताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 01:04 IST

लाखरन येथील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपरिक पिके घेऊन शेतकऱ्यांसाठी वेगळी दिशा दिली होती.

कर्जत : तालुक्यातील नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या लाखरन गावातील शेतकऱ्याने रताळ्याचे अमाप पीक घेतले असून एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक घेण्याबरोबरच अन्य पीक घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे हे या प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.लाखरन येथील  शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपरिक पिके घेऊन शेतकऱ्यांसाठी वेगळी दिशा दिली होती. ही पिके आपल्याकडे होत नाहीत हे जुन्या शेतकऱ्यांचे म्हणणे खोडून काढले होते व विक्रमी पिके काढून दाखविली होती. यावेळी त्यांनी रताळ्याचे विक्रमी पीक काढले असून एक ते साडेतीन किलोपर्यंत एकेका रताळ्याचे वजन आहे. त्यांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, श्रद्धा फाउंडेशन आशा अनेक संस्थांकडून प्रगतशील शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.पुणे येथील एक कंपनी व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील हे भाजीपाला व फळांच्या अपारंपरिक पिकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एक शेतकऱ्यांचा समूह तयार करीत असून गेली तीन वर्षे ते याबाबत प्रयत्नशील आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे अद्ययावत बियाणे, खते इतरही मार्गदर्शन केले.मी नेहमी वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल याकडे लक्ष देतो. रताळ्याचे पीक घेताना मल्चिंग पेपर व सिलिकॉन खताचा खूप फायदा झाला- सूर्यकांत भासे, प्रगतशील शेतकरीशेतकरी शेतीचे चांगले उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यामागे एका शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हाच प्रामाणिक हेतू आहे.- पुंडलिक पाटील, माजी बांधकाम सभापती, राजिप.