शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी होणार मालामाल!

By admin | Updated: May 5, 2016 00:46 IST

रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी

- आविष्कार देसाई, अलिबाग

रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी घ्यावीत यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. केरळची लाल केळी, हळद आणि त्यापाठोपाठ आता भुईमुगाच्या शेंगाचे पीक जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव आणि महाड तालुक्यात घेतले आहे. एक हजार एकराच्या माध्यमातून सुमारे १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडून शेतकरी मालामाल होणार आहेत.जिल्ह्यात पूर्वी भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. भाताच्या पिकामुळे रायगड जिल्हा समृध्द होता. कालांतराने औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी या उद्योगामध्ये गेल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मदार मोठ्या संख्येनेही भाताच्या पिकावरच राहिली होती. त्यामुळे आर्थिक सुबत्ता येण्यात अडचणी निर्माण झाल्या. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा यासाठी त्यांनी नगदी पिकांकडे वळले पाहिजे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेने अलीकडच्या काळात प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी लोकमतला दिली.भुईमुगाच्या पिकावर पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी असायची त्याच पावलावर पाऊल ठेवत रायगड जिल्ह्यातील माणगाव, पोलादपूर आणि महाड तालुक्यात भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे. महाड तालुक्यात ७०० एकरावर, पोलादपूर तालुक्यात सुमारे २०० एकरामध्ये आणि माणगाव तालुक्यातील १० यासह अन्य ठिकाणी ९० एकरामध्ये भुईमुगाचे पीक घेण्यात आले आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.३० ते ३०० क्विंटल भुईमुगाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नसल्याने भुईमूग तोडणी यंत्र ५० टक्के अनुदानावर कृषी विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या यंत्राची किंमत ४८ हजार रुपये आहे. शेतकऱ्यांना फक्त २४ हजार रुपयांमध्ये हे यंत्र मिळणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग- भुईमुगाला बाजारामध्ये सुमारे सात हजार रुपये क्विंटल दर आहे. - एका एकरामध्ये सुमारे २० क्विंटल भुईमूग तयार होतो. त्याची किंमत एक लाख ४० हजार रुपये होते. - सध्या एक हजार एकरावर हे पीक घेण्यात आले आहे. त्यानुसार १४ कोटी रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे. - महाड तालुक्यामध्ये सहा लाख रुपये किमतीची मिनी आॅईल मिलही उभारण्यात आली आहे.