शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
4
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
5
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
6
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
7
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
8
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
9
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
10
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
11
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
12
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
13
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
14
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
15
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
16
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
17
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
18
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
19
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
20
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश

भरधाव एसटीची दोन कारला धडक

By admin | Updated: December 29, 2016 01:58 IST

दापोलीकडून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार

माणगाव : दापोलीकडून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसचालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या दोन कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेगावजवळ बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडला.दापोली येथून बोरीवलीकडे निघालेली एम.एच. १४ बी.टी. ३९४६ या क्र मांकाची एस.टी. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना तळेगावनजीकच्या एका वळणावरती वाहनाला ओव्हरटेक करत असताना याच वेळी मुंबईकडून महाडकडे येणारी एम.एच. ०४ डी.एन. ६४२२ या क्र मांकाच्या स्वीफ्ट डिझायर या कारला धडकली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या आय टेन कारला समोरून ठोकर मारली. ही ठोकर एवढी भीषण होती की आयटेन या कारचा चक्काचूर झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच यातील पाच जणांचे प्राण वाचले असले तरी ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईत पाठविण्यात आले आहे.आय टेनमधील निसार सारंग, रिहाना सारंग, कादीर उमर मुसा, शाहीन मुसा, रीमा मुसा (सर्व राहणार नवी मुंबई, नेरूळ) हे पाचही जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कारची अवस्था इतकी भीषण होती की कारचालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांना कसरत करावी लागली. अथक परिश्रमानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सेवाभावी नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळेच अपघातग्रस्तांचे प्राण वाचले. अपघातानंतर बसचालक मात्र फरार झाला. गोरेगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. (वार्ताहर)