शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

पेणमधील ९,४९६ शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:52 IST

उत्पादन खर्चही निघेना : तालुक्यातील २८४०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित

- दत्ता म्हात्रे पेण : अवकाळी पावसामुळे पेण तालुक्यातील १४० गावांमधील ९,४९६ खातेदार शेतकऱ्यांच्या २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे उत्पादन मातीमोल ठरले आहे. तब्बल सात हजार १०२ एकर भातशेतीला अवकाळी पावसामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.रायगड जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल कोकण आयुक्तांना पाठविला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ७९ हजार १३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल एक हजार ८१६ गावांमधील ७१ हजार १३ खातेदार शेतकºयांचे १८ कोटी, १० लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची आकडेवारी आयुक्तांकडे अहवालातून पाठविण्यात आली आहे. शेष राहिलेल्या भातपीक उत्पादनात उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकºयांचा एकरी १८ हजार ते १९ हजार रुपये उत्पादन खर्च झाला आहे. तर हातात जेमतेम तीन ते चार हजार रुपये पडणार असल्याचे झोडणी केलेल्या भातपीक उतारावरून दिसत आहे. खरिपाचे पीक हातातून गेल्याने वर्षभर मजुरी करून शेतकºयांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागणार आहे.पेण तालुक्यातील आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत महापूर येऊन भातशेतीला पावसाचा पहिला तडाखा बसला होता. पेणच्या पश्चिमेला असलेली खारभूमी शेती पुराने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर इकडून तिकडून रोपे गोळा करून लागवड केलेली भातशेती आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत आलेल्या अवकाळी पावसामुळे वाया गेली आहे. शासकीय पंचनामे पूर्ण करून जाहीर झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत पेणची १४० गावातील ९,४९६ खातेदार शेतकºयांची २८४०.६६ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती नष्ट झाली आहे. आर्थिक नुकसानीची आकडेवारी एक कोटी ९३ लाख १६ हजार रुपये सरकारी अहवालात नमूद करण्यात आली आहे.यंदा खरीपातील उत्पन्नाचा हिशोब द्यावयाचा झाल्यास ‘आमदानी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा आहे. एक एकरी भातशेती उत्पादन खर्च १८ ते १९ हजार रुपये इतका खर्च होतो. सरासरी अडीच ते तीनपट उत्पादन घेतले जाते. २१ ते २२ क्विंटल एकरी भातशेतीतून भाताचे उत्पादन घेतले जाते. एकरी ५५ ते ६० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, यंदा एकरी जेमतेम तीन ते चार क्विंटल इतकेच हाती उत्पन्न मिळत असल्याने केलेला खर्च भरून निघणार नाही.शेती उत्पादनाचा एकरी खर्चएक एकर शेतीला टॅक्टरद्वारे जमीन उखळणीसाठी १००० रुपये, भातपीक वाफे (राब) तयार करणे १५००, शेताचे बांध मजबुती करणे १५००, बी-बियाणे १२००, खते व कीटकनाशके २५००, तण काढणे १००० रुपये, लागवड ३०००, कापणी ३५००, बांधणी १०००, झोडणी ३०००, असे एकूण १८ ते १९ हजार एकरी खर्च येतो. मात्र, खरिपाच्या उत्पन्नाची बेगमी करून जर हातात जेमतेम पडणार असल्याने अवकाळीने खरीप हंगामाची धूळधाण उडविली आहे.