शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहाला दिली खोटी माहिती, नळपाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:59 IST

अलिबाग : तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत तीनविरा वाढीव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत विधानसभेमध्ये पुरवण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे.

अलिबाग : तालुक्यातील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत तीनविरा वाढीव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत विधानसभेमध्ये पुरवण्यात आलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे सभागृहाला खोटी माहिती पुरवणारे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्याविरुद्ध विधिमंडळ सचिवालयाकडे तक्रार केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली.तीनविरा पाणीपुरवठा योजनेचे विस्तारित काम हाती घेण्यात आले होते. मुळातच त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र नसल्याचा दाखला तत्कालीन उपअभियंता आर. एस. माळी यांनी दिला होता. त्याच जलशुद्धीकरण केंद्राचे काम वाळूअभावी अपूर्ण आहे, असा शेरा मारून जिल्हा परिषदेने त्यांच्या अहवालामध्येच कबूल केले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे कामच अपूर्ण असेल, तर या योजनेमधून सर्व गावांना पाणीपुरवठा सुरू आहे, हे जिल्हा परिषदेचे उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट होते. सद्यस्थितीमध्ये या अपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राच्या बांधकामावर झुडपांचे जंगल उगवले आहे, असे असताना जिल्हा परिषद हे काम प्रगतिपथावर आहे, असा लेखी अहवाल विधिमंडळाला पाठवत असेल, तर ती विधिमंडळाची सरळसरळ दिशाभूल असल्याचे सावंत यांनी सांगितले.योजनेमधील जलशुद्धीकरण केंद्र, फिल्टर प्लांट या सारखी प्रमुख कामे २०१४पासून अपूर्ण किंबहुना पूर्णपणे बंद असताना, सदरील कामे ‘प्रगतिपथावर’ आहेत, असा अहवाल तारांकित प्रश्नासाठी पाठविल्याने संजय सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, कार्यकारी अभियंता यांनी विधिमंडळाला दिलेली माहिती बरोबर असेल, तर तीनविरा येथील फिल्टरेशन प्लांटची इमारत अपूर्ण कशी, तसेच प्लांटजागेवर नसताना भस्मे यांची माहिती खरी कशी मानायची? असा प्रश्न पडला आहे.>वस्तुनिष्ठ आणि उपांगानुसार झालेल्या कामाची माहिती विधिमंडळाला पुरवण्यात आली आहे. दिलेली माहिती बरोबर आहे.- हिरासिंग भस्मे,कार्यकारी अभियंता