शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीला फटका; दक्षतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 22:44 IST

महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मज्जाव

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अलिबाग, पेण, पाली आणि रोहासह अन्य भागांमध्ये पावसाने कहर केला. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाचक्रिवादळही निर्माण झाले आहे. या महाचक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला फटका बसणार नसला तरी ८ नोव्हेंबरपर्यंत महाचक्रिवादळाची तीव्रता राहणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा भातशेतीला बसला आहे. महाचक्रिवादळामुळे मासेमारी करणाऱ्यांनाही मज्जाव करण्यात आला असल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस अधूनमधून बरसत असल्याने मोठ्या प्रमाणात भातशेती उद्ध्वस्त झाली आहे. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये भात कापणीला सुरुवात करण्यात येते. मात्र, याच कालावधीत परतीच्या पावसाने कहर केल्याने शेतामधील भाताचे पीक आडवे झाले. अलिबाग, पेण, रोहा, कर्जत, माणगाव या तालुक्यातील शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही पावसाचा जोर सुरूच होता. अलिबाग, पेण, पाली आणि रोहा या ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.सतत बदलत जाणाºया हवामानामुळे गेल्या काही दिवसांपासून समुद्रही खवळलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे मासेमारी करणाºया नौकाही किनाºयावरच उभ्या आहेत. त्यामुळे मच्छीमार बांधवांना मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये जाता न आल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वादळी वाºयासह बरसणाºया पावसामुळे काही ठिकाणच्या घरांचे छप्पर उडून गेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष पुन्हा दक्ष करण्यात आला आहे. मदतीसाठी नागरिक या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.नियंत्रण कक्ष २४ तास सुरूगेले काही दिवस पावसाने कहर केल्यामुळे भातशेतीची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात आले आहेत. पंचनामे झाले नसतील, तसेच पंचनाम्यामध्ये काही तक्रारी असल्यास तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.बेलाची वाडीला चक्रिवादळाचा तडाखाकर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास अचानक चक्रिवादळाने थैमान घालत अवघ्या काही मिनिटांत मोठमोठाले झाडे उन्मळून पडली. विजेचे लोखंडी खांब वाकून काही खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे घरावर व दुकानावर पडून मोठे नुकसान झाले. तर घरावरचे छप्पर उडून सामान्य नागरिकांना याचा आर्थिक फटका बसला आहे.

कर्जत तालुक्यातील अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी परिसरात अचानक आलेल्या चक्रिवादळाने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर महावितरणलाही या चक्रिवादळाचा मोठा फटका बसला. अनेक घरांची पडझड झाली असून झाडे उन्मळून घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यात विद्युत खांब पडल्याने परिसर दोन दिवसांपासून अंधारात आहे. तालुक्यात परतीच्या पावसाचा कहर सुरूच असून बुधवार, ३० आॅक्टोबरला अंभेरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाचीवाडी परिसरात रात्रीच्या वेळी झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. महादू लोहकरे यांच्या घराचे नुकसान झाले असून दुंदा कोकाटे यांच्या वीटभट्टीवर आंब्याचे मोठे झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे़ त्याचप्रमाणे चंद्रकांत कोकाटे यांच्या दुकानाचे व मारुती पारधी यांच्या घराची पत्रे फुटल्याने नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उभे पीक आडवे झाले, शेतातच भिजून कुजल्याने हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजाची यंदाची दिवाळी काळी झाली, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस