शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीची पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:17 IST

अलिबाग शहराच्या दक्षिणेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंड्याचा आगरकोट किल्ला आहे.

रेवदंडा : अलिबाग शहराच्या दक्षिणेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंड्याचा आगरकोट किल्ला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असाही केला जातो. १७३० पासून १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचे व व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. १५०५ मध्ये पोर्तुगीज चौलला आले आणि त्यांनी किल्ला बांधला. १६८३ मध्ये छत्रपती संभाजीराजांनी रेवदंडा जिंकण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात अपयश आले होते.

१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून १७४० मध्ये पोर्तुगीजांनी चौल प्रदेश मराठ्यांना दिला. चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी; नैसर्गिक सौंदर्य व वैशिष्ट्यपूर्ण अशा समुद्रकिनाऱ्यामुळे पोर्तुगीज, निजामशाह, आदिलशाह, सिद्धी, फ्रेंच, इंग्रज व मराठे यांनी वेगवेगळ्या कालखंडात चौल-रेवदंड्यावर आपले वर्चस्व गाजवले होते.किल्ल्याचा परिसर चार ते पाच किलोमीटरचा आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये रेवदंडा गाव वसले आहे.

किल्ल्याला १५ बाजू व ११ बुरुज असल्याच्या नोंदी आहेत. पोर्तुगीज इमारती सोडून मंदिरे, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत. परदेशी पर्यटक किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. मात्र, तटबंदीची पडझड झाल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. तिची डागडुजी करण्याची मागणी इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडFortगड