शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट डीव्हीडींचे चंदेरी दुनियेला लागले ग्रहण

By admin | Updated: January 5, 2016 02:02 IST

क्रिकेट, टीव्ही, सर्कस आदींपेक्षा मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो पाहणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो.

अरुणकुमार मेहत्रे, कळंबोलीक्रिकेट, टीव्ही, सर्कस आदींपेक्षा मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो पाहणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो. परंतु अलीकडे पायरसी प्रकारामुळे या चंदेरी दुनियेला ग्रहण लागले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आता तो काही तासांतच इंटरनेटवर पाहावयास मिळत आहे. प्रदर्शनापासून अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या बनावट सीडी, डीव्हीडी बाजारात उपलब्ध होतात. या आॅफलाइन तसेच आॅनलाइन पायरसीने चित्रपटसृष्टीतील नफा वेगाने कमी करण्यास सुरु वात केली आहे. रायगड जिल्ह्यात याचे लोण वाढत असून, त्याचा फटका चित्रपटसृष्टीला बसत आहे. नवीन चित्तपट, उत्तम दर्जाचे चित्र आणि आवाजासह डाऊनलोड करण्याची सुविधा पुरविणाऱ्या अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत. त्यामुळे चित्रपट उद्योगाच्या नफ्यात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे.बॉलीवूडचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ब्रँड किंवा कंपनीच्या सीडी, डीव्हीडी बाजारात येण्यास महिना ते दोन महिने लागतात. मात्र बनावट सीडी आणि डीव्हीडी प्रदर्शनादिवशीच विक्र ीस उपलब्ध होत आहेत. सध्या इंटरनेटद्वारे डाऊनलोडिंग फास्ट होते. त्यातच फ्री, अनलिमिटेड डाऊनलोडिंग अशा नेटच्या सुविधांमुळे फटका बसतोय. यावर नियंत्रण हवे असल्याचे अधिकृत सीडी विके्र त्यांचे म्हणणे आहे. बनावट सीडी विक्र ीच्या तक्र ारी आहेत. मात्र बनावट सीडी, डीव्हीडी निदर्शनास आल्या तर आम्ही संबंधितास फक्त ताब्यात घेऊ शकतो. त्या सीडी बनावट आहेत की नाही, हे तपासणारी यंत्रणा पनवेलच काय समस्त रायगडात नाही. मुंबई येथून अशा बनावट सीडी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कुठल्याही अश्लील साहित्याची विक्र ी करणे किंवा अशा प्रकारचे साहित्य सोबत बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अश्लील सीडी विक्र ीचा व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या व्यवसायातून पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथे महिन्याकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.