शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीत दिले बनावट प्रमाणपत्र, चौघा उमेदवारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2023 09:46 IST

सर्व कागदपत्रांची केली शहानिशा

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्हा पोलिस दलात नुकत्याच झालेल्या कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये  प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून   भरती होण्याचा  खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या चौघा जणांना अलिबाग पोलिसांनी  अटक केली असून, अशाप्रकारे आणखी पाच जणांनी फसवणूक केली असल्याचे समजते. त्यांच्या कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रोहित बबन मगर (वय २६), केशव गिरजाची मुरमुरे (२८ ), गोविंद सुखदेव ठाणगे (२७) व अच्युत भागवत माने  अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत. सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.रायगड पोलिस दलात शिपाई पदासाठी २७२ व चालकपदाच्या आठ जागांसाठी  भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठीच्या आरक्षित कोट्यातून अनेकांनी अर्ज केले होते. मैदानी व लेखी परीक्षेतून अंतिम निवड जाहीर  करण्यात  आली असून, पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून नेमणूक करण्यात येत आहेत. दरम्यानच्या कालावधीत गडचिरोलीतील पोलिस भरतीत बोगस प्रमाणपत्र रॅकेट  प्रकरणात रायगडमधील हवालदार सिद्धेश पाटील याला अटक केली. 

सर्व कागदपत्रांची केली शहानिशा

रायगड जिल्हा भरतीतही अशाच पद्धतीने बनावट  प्रमाणपत्र देण्यात  आल्याचे शक्यतेने या कोट्यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या  सर्व कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. त्यातून भरतीचा हा बोगस प्रकार उघडकीस आला आहे.  चौघा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र कोणी दिले, यासाठी किती रक्कम दिली, याबाबत पुढील तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय जाधव हे करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकalibaugअलिबाग