शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बनावट कॅटरींग इन्स्पेक्टरच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:10 IST

कर्जत रेल्वे सुरक्षा बल : कमर्शिअल विभागाची कारवाई

कर्जत : काही दिवसांपासून कल्याण बदलापूर रेल्वे स्थानकात बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून धुमाकूळ घालणा-या भामट्यास रेल्वे सुरक्षा बलाने कर्जत रेल्वे स्थानकात रंगेहात पकडले. ही व्यक्ती रेल्वे स्थानकातील कॅटरींग व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे कॅटरींग इन्स्पेक्टर बनून त्यांच्याकडील वस्तू तपासण्याचे नाटक करत त्यांना हजारो रुपयांचा गंडा घालत होता.

हे छायाचित्र कर्जत रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांना ही व्हॉटसअपद्वारे मिळाले होते. अशातच स्वत:ला कॅटरींग इन्स्पेक्टर म्हणवणारा भामटा ३१ आॅगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावरील फलाट क्रमांक एक वरच्या कॅटरींगचे मॅनेजर मुलायम सिंग ह्यांची चौकशी करायला आला. ही चौकशी सुरू असताना कर्तव्यावर असलेले आरपिएफ कर्मचारी मुक्कदर तडवी व पंकज सिंग यांना त्याच्या हालचालीवर संशय आला. त्यामुळे त्यांनी बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनुन आलेल्या व्यक्तीस आरपीएफ कार्यालयात अणून पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिंग यांच्या समोर हजर केले. सिंग यांनी त्याची कसुन चौकशी केली असता या व्यक्तीने आपला गुन्हा कबूल केला. कल्याण, बदलापुर येथेही आपण बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर बनून गेलो होते असे सांगितले. या व्यक्तीचे नाव मोहम्मद खान ( ४०) असून तो पूजा नगर, मीरा रोड येथील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. बनावट कॅटरींग इन्स्पेक्टर उर्फ मोहम्मद खान ह्याची चौकशी करुन सिंग यांनी त्याला कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डोंगरे यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सोपविले.च्काही दिवसांपासून कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती कॅटरिंग इन्स्पेक्टर असल्याचे भासवत स्टॉल धारकांना जेरीस आणत त्यांना हजारों रुपयांना लुबाडत असल्याच्या घटना घडत होत्या.च्या व्यक्तीचा शोध सर्व रेल्वे स्थानकांवर घेण्यात येत होता. या बनावट व्यक्तीचे छायाचित्र हाती लागताच कर्जत विभागातील मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शिअल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे त्यांनी ते रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडे पाठवून कारवाईचे आदेश दिले. 

टॅग्स :Karjatकर्जतRaigadरायगड