शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अडचणींचा सामना करत कोळी बांधव होळीसाठी सज्ज; मुरुडमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 01:15 IST

खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी

मुरुड : २०२० व २१ या वर्षापासून वादळी वारे, अवकाळी पाऊस व त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक मच्छिमार पुरते हैराण झाले आहेत. सततच्या संकटांमुळे रायगड जिल्ह्यातील कोळी समाज पूर्णतः हवालदिल झाला आहे. तरी अशा बिकट परिस्थितीचा सामना करीत शासनाच्या मदतीची कोणतीही अपेक्षा न ठेवता संस्कृती जपत पारंपरिक होळी (शिमगा) सण आनंदाने साजरा करताना दिसत आहेत.

होळी सण हा जणू कोळी समाजाचा आवडता सण असून,  सर्वात प्रथम होड्यांना रंगीबेरंगी पट्ट्याने सजवून, त्याला झूल झालर, वेगवेगळ्या रंगांचे झेंडे तसेच होडीच्या शेंड्याला भारतीय ध्वज मोठ्या डौलाने डुलत असून, आम्ही भारतीय आहोत, हे अभिमानाने सांगत असतात. तसेच होडीच्या किनाऱ्यास आकर्षक फुलांची माळ सजवल्याने होड्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडते.

रायगड जिल्ह्यातील असंख्य कोळी बांधव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. खोल समुद्रातून मासेमारी झाल्यावर ही मंडळी मुंबई येथील ससून डॉक (कुलाबा मार्केट) येथे मिळालेली सर्व मासळी विकून आपल्या घरी परतत असताना, खंदेरीच्या वेताळ देवाचे दर्शन घेऊनच घरी परततात; तर यातील काहीजण गावाकडून स्वतःच्या बोटीनेसुद्धा वेताळ देवाच्या दर्शनाला येत असतात अशी माहिती एकविरा व कमलावती या होड्यांचे मालक चंद्रकांत बाबू सरपाटील यांनी दिली.

दहा हजारपेक्षा जास्त होड्या येतात किनारीरायगड जिल्ह्यामधील सुमारे दहा हजारपेक्षा जास्त होड्या होळी सण साजरा करण्यासाठी सागरी किनाऱ्याला येत असून, हा सण मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात. मुंबईहून आलेली होडी व त्यावर काम करणारे १५ ते १६ जण गावात परतून आपल्या नातेवाईक व मित्रांमध्ये रममाण होत असतात. किमान दहा ते बारा दिवस गावात वस्ती करून होळी साजरी करून या बोटी पुन्हा मुंबईकडे रवाना होत असतात. मोठ्या आनंदात होळी सण हा कोळी समाजातर्फे दरवर्षी साजरा केला जातो, असे तांडेल संदीप डाकी यांनी सांगितले.