शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मध्य रेल्वेच्या लौजी स्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: February 23, 2017 06:13 IST

मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून

मोहोपाडा : मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून थेट खोपोलीस उपनगरीय सेवा सुरू करून तब्बल १६ वर्षांचा कालखंड उलटला असला, तरी या मार्गावरील लौजी, डोलवली, केळवली व पळसदरी या स्थानकांची अवस्था बिकटच आहे. या रेल्वेस्थानकांवर मूलभूत सुविधांची वानवा आहे, तसेच फलाटावर झाडे-झुडपे वाढली असून, याचा प्रवाशांना त्रास होत आहे. येथील झाडांची, गवताची कापणी करून फलाट स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.फलाटांवर वाढलेली झुडपे, प्रवाशांना बसण्याची गैरसोय, अपुरी प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांचा नुसताच देखावा, फलाटावरील निवारा शेडची कमतरता, परिणामी, ऊन- वारा -पाऊस या तिन्ही हंगामाचा प्रवाशांना करावा लागणारा सामना, तसेच परतीच्या प्रवासाची व पहिल्या वर्गाची तिकिटे न मिळणे, अशा समस्या या मार्गावरील प्रवाशांना सतावत आहेत. तर ६० वर्षांपूर्वी चार पत्र्यांची उभारलेली शेड अद्याप पडक्या अवस्थेत उभी असून त्यामध्ये होणारी घाण व झुडपे यामुळे प्रवाशांंना त्रास होत आहे. मुंबई-पुणे बोरघाट-कर्जत-लोणावळा असा थेट प्रवास सुरू होण्याअगोदर खोपोलीतून प्रवास होत असे. खोपोली रेल्वे १९०२ मध्ये सुरू झाली. मात्र, जुनी रेल्वेसेवा असूनही रेल्वे प्रशासन या मार्गावरील प्रवाशांंना सुविधा देण्यास अद्याप कमी पडत असल्याचे चित्र रेल्वेस्थानकांवरील फलाटांवर पाहावयास मिळत आहेत.केळवली, डोलवली, पळसदरी स्थानकांची दुर्दशाच्खोपोलीचे प्रवेशद्वार म्हणून व नवीन खोपोली म्हणून उदयास येणाऱ्या लौजी स्थानकात गवत व झाडे-झुडपे पाहून हेच रेल्वेचे स्थानक आहे का? असा प्रश्न रेल्वेप्रवासी करीत आहेत. तर याहीपेक्षा बिकट अवस्था केळवली, डोलवली व पळसदरी रेल्वेस्थानकांची आहे. च्मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी कर्जत, नेरळ रेल्वेस्थानकांना भेटी देऊन स्थानकांची पाहणी केली. त्यादरम्यान ही स्थानके स्वच्छ व चकचकीत करण्यात आली होती. मात्र, कर्जतच्या पुढील पळसदरी, केळवली, डोलवली व लौजी ही स्थानके अद्यापही जंगली झुडपात हरवलेली असून, असुविधांचे माहेरघर ठरत आहेत.च्केळवली, डोलवली व लौजी या स्थानकांत रेल्वेचा एकही कर्मचारी नाही, अशी स्थानके भारतीय रेल्वेच्या सेवेतील एकमेव स्थानके असावीत आणि तीही भारतीय रेल्वेने अभिमानाने मिरवणाऱ्या व रेल्वेचा उगम असणाऱ्या मुंबईपासून फक्त ११० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेतील खोपोली मार्गावरील लौजी, डोलवली व केळवली ही स्थानके आहेत.