शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

माथेरान रोप-वेच्या माती परीक्षणासाठी उत्खनन, टाटा समूहाकडून काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 04:48 IST

माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.

- मुकुंद रांजणेमाथेरान : माथेरानमध्ये विकासाचा स्रोत म्हणून तसेच पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वेचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप-वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉइंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे.माथेरानच्या पायाभूत सुविधेसाठी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होण्यासाठी सरकार दरबारी अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाली नव्हती. त्यामुळे मागील काही काळात स्थानिक हॉटेलमालकाने रोप-वे सुरू होण्यासाठी केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानंतर स्थानिकांच्या सततच्या मागणीवरून अखेरीस रोप-वे सुरू करण्यास केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली आहे. येथील मुख्य थांबा असलेल्या नौरोजी उद्यानातील माधवजी पॉइंटच्या दर्शनी भागात मातीच्या परीक्षणासाठी उत्खनन सुरू केले आहे.रोप-वेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या पर्यटनस्थळाला आणखी चालना मिळणार आहे. रोप-वेने एका वेळेस ८० पर्यटक ये-जा करू शकतात. आशिया खंडातील हा सर्वात मोठा रोप-वे बनणार असून, याची लांबी १७०० मीटर आणि उंची अडीच हजार फूट आहे. कर्जत-भूतिवली-गार्बट पठार मार्गे माधवजी पॉइंटपर्यंतच्या या दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासात पर्यटकांना विविध पॉइंट्स आणि निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान न्याहाळत गाठता येणार आहे.टाटा समूह रोप-वे बनवण्यासाठी माथेरान नगरपालिकेची आणि वनविभागाची जागा व्यापणार आहेत. यामध्ये अनेक झाडांची कत्तल होणार आहे. त्याचप्रमाणे हेरिटेज असलेले माधवजी उद्यानातील बहुतांश जागा रोप-वे मधून उतरल्यावर पर्यटकांना वापरावी लागणार आहे. त्यामुळे उद्यानात फिरावयास आलेल्या अन्य पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या सर्वच जागेचा वापर करताना नगरपालिकेसही रोप-वेच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त व्हावे, अशी सूचना केली होती तूर्तास एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के रक्कम नगरपालिकेस देण्याचे निश्चित झाले आहे.माधवजी पॉइंट येथे छोटे स्टॉल्स लावून आम्ही पाच - सहा जण व्यवसाय करीत आहोत. यावर आमच्या कुटुंबाची गुजराण होत आहे. आमच्या स्टॉल्सच्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून त्यामुळे आम्ही बेरोजगार होऊ. नगरपालिकेने तसेच रोप-वेच्या समूहाने काहीतरी पर्यायी रोजगाराची अथवा प्रकल्पात काम देण्याची व्यवस्था करावी.- मयूर कदम,स्टॉल्सधारक, माथेरानमाथेरानचा विकासात्मकदृष्ट्या रोप-वे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे; परंतु प्रकल्पात प्रामुख्याने स्थानिक बेरोजगारांना काम देण्यासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढणार असून, रोजगारात भर पडणार आहे. व्यवसाय वृद्धिंगत होऊन आपोआपच पर्यटनक्र ांती पाहावयास मिळेल.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

टॅग्स :Matheranमाथेरान