शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरमध्ये वाहनतळासाठी उत्खनन

By admin | Updated: December 8, 2015 00:53 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत

खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजित ट्रक टर्मिनलच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन केले जात असून माती उत्खनन करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत खालापूरचे प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांनी दिले आहेत.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. कळंबोली ते किवळे या ९४ किमीच्या अंतरात अवजड वाहनांना थांबण्यासाठी जागा नसल्याने खालापूर तालुक्यातील ठाणेन्हावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाहनतळ प्रस्तावित आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने वाहनतळांचे काम खाजगी कंपन्यांना बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर दिले आहे. या कंपन्यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला वाहनतळ उभारून दिल्यानंतर काही वर्षासाठी वाहनतळाचा ताबा खाजगी कंपन्यांकडे राहणार आहे. त्यातून येणारे उत्पन्न खाजगी कंपन्यांना मिळणार असून शासनाने तसा करार केला आहे.वाहनतळासाठी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. मात्र महसूल विभागाकडून उत्खनन करण्यासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. खाजगी जागेत उत्खनन करताना परवानगी घेवून शासनाला रॉयल्टी भरावी लागते. मात्र ज्या खाजगी कंपनीने सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे, त्या कंपनीने परवानगी घेतली नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. शिवाय रॉयल्टीही भरली नसल्याने हे काम वादात सापडले आहे. मुख्य म्हणजे एक्स्प्रेसवेच्या बाजूला सुरू असलेल्या या कामाची माहिती महसूल विभागाला नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.