शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

हुतात्मा कोतवाल मैदानावर खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:14 IST

दीडशे वर्षे जुने व्यायाममंदिर : परवानगी नसताना विश्वस्तांकडून काम सुरू; अकरा जणांवर गुन्हा दाखल

संजय गायकवाड।लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर आहे. त्याच्या समोरील मैदानावर बांधकाम करून दुकान गाळे काढण्याचा घाट व्यायाम मंदिर विश्वस्त मंडळाने घातला होता. मात्र कर्जतमधील नागरिक आणि नाभिक समाजाच्या वतीने हा डाव उधळून लावला आहे. विश्वस्त मंडळाने मैदानावर अचानक काम सुरू केल्याने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणारे व नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांच्या जागरूकतेमुळे हे काम बंद पाडले आहे. हुतात्मा कोतवाल मैदानावर परवानगी नसताना खोदकाम करणाऱ्यांविरोधात मंगळवार, १७ डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या वतीने तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील हृषीकेश जोशी यांनी, कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित कार्यालयांत पत्र पाठविले आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर १७४/१९ मधील मैदान शासनाने हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर संस्थेस वापरण्यास दिले असून सुमारे १५० वर्षांपासून ते वापरात असल्याचे पत्रात नमूद केले आहे. याबाबत कार्यालयास विविध वेळी पुरावे, पत्र व नोटीस देण्यात आल्या आहेत. मैदानाच्या जागेवर बांधकाम करण्यास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे कर्जत नगर परिषद कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे एमआरटीपीच्या तरतुदीनुसार संबंधितांवर २ दिवसांच्या आत गुन्हा नोंदवावा, असे नमूद केले होते. मात्र तरीही २ डिसेंबर रोजी सदर मैदानावर विश्वस्त मंडळाच्या सांगण्यावरून, ठेकेदाराने मजुरांच्या व जेसीबी यंत्राच्या साहाय्याने बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले. याबाबत अ‍ॅड. हृषीकेश जोशी यांनी संबंधित कार्यालयांना कळविले होते. नाभिक समाजाचेही पत्र देऊन काम बंद करण्याचा इशारा दिला होता. जोशी यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, मात्र प्रशासन विश्वस्त मंडळावर कोणतीच कारवाई करीत नसल्याने अखेर जोशी यांनी आमदार प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. दरेकर यांनी १३ डिसेंबर रोजी लक्षवेधी सूचना टाकली आणि मग संबंधित प्रशासनाचे डोळे उघडले. खोदकामाची तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने पोलीस ठाण्यात विश्वस्त मंडळाविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये साहाय्यक लक्ष्मण माने यांनी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर सिटी सर्वे नंबर १७४/ २०१९ मध्ये असलेले जुने व्यायाम मंदिर जीर्ण झाले असल्याने त्याचे नव्याने बांधकाम करण्याची परवानगी मागितली होती, त्या वेळी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांनी सादर केलेल्या कागदपत्रे आणि नूतनीकरण परवानगीसाठी सादर केलेल्या नकाशात धर्मदाय सहआयुक्त, मुंबई यांना तफावत आढळली. त्यामुळे १३ मे २०१९ रोजी नूतनीकरणाची बांधकाम परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबतचे रिफ्युज पत्र हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले आहे, त्यानंतर १५ जून २०१९ रोजी पुन्हा नूतनीकरणाच्या परवानगीसाठी नव्याने अर्ज करण्यात आला. त्याच दरम्यान मैदानात बांधकाम करू नये म्हणून कर्जत नगर परिषद तसेच इतर कार्यालयांनाही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी परदेशी यांनी तोंडी स्थगिती आदेश दिले होते. बांधकाम परवानगी नाकारल्याबाबत व्यायाम मंदिराच्या अध्यक्षांना २५ नोव्हेंबर रोजी लेखी कळविण्यातही आले होते.च्मात्र तरीही २ डिसेंबर रोजी हुतात्मा कोतवाल व्यायाम मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत हरिभाऊ दुर्गे यांनी व त्यांच्या समितीवर असलेले सचिव-शंकर अण्णा भिंगारे, खजिनदार-उदय विनायक मांदुस्कर, विश्वस्त - अविनाश बाळकृष्ण बडेकर, गणेश नंदकुमार ढमाले, रमेश नारायण देशमुख, शिवाजी राम भासे, मोरेश्वर गणपत देशमुख, शशिकांत शिवाजी कडव, संजय नेताजी बडेकर, सुनील हरिभाऊ दुर्गे या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी नगर परिषदेची बांधकाम करण्याची कोणतीही परवानगी नसताना व्यायाम मंदिराच्या मोडकळीस आलेल्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत खड्डे खोदले आणि लाकडी कुंपण करून अवैद्य बांधकाम चालू केले.च् खोदकामाची तक्रार केल्यानंतर १५ दिवसांनी नगर परिषद प्रशासनाने पोलीस ठाण्यात विश्वस्त मंडळाविरोधात तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या लेखी आदेशान्वये रचना साहाय्यक लक्ष्मण माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.