शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

१२०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन

By admin | Updated: July 16, 2017 02:46 IST

मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी कधी इंटरनेट बिघाड तर कधी वीजपुरवठा खंडित, कधी सर्व्हर डाउन आदी अडचणींवर मात करीत मोबाइलचे हॉटस्पॉट जोडून आतापर्यंत प्रत्येकी बाराशे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी यंदापासून आॅनलाइन असेसमेंटद्वारे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व्हर डाउन, चुकीच्या उत्तरपत्रिका, प्राध्यापकांची नोंदणी न होणे आणि इतर अनेक तांत्रिक त्रुटींमुळे ही प्रक्रि या चर्चेत राहिली आहे. मात्र, नेरळ येथील मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालयातील प्रा. सागर शशिकांत मोहिते आणि कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत महाविद्यालयातील प्रा. राहुल सुतार यांनी मोबाइल हॉटस्पॉटवर विद्यार्थ्यांचे पेपर तपासून अनुभवी प्राध्यापकांना आदर्श घालून दिला.विशेष म्हणजे, काही अनुभवी प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना दोन आकडी संख्याही गाठली नाही. जून महिन्यात परीक्षांचा निकाल लागतो. मात्र, यंदा जून महिन्यात उत्तरपत्रिका मूल्यांकन करण्याची सुरुवात झाली तीसुद्धा नवीन पद्धतीने. या पद्धतीत अनेक अडचणी आल्याने प्राध्यापक वर्ग वैतागला, त्यामुळे वेळेत निकाल लागला नाही.