शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या हॉल तिकिटात त्रुटी, विद्यार्थी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:52 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी

- प्राची सोनवणेनवी मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांनी यातून अंग काढून घेतल्याने ऐन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात खेटा माराव्या लागत असल्याने हतबल झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनाही याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.वास्तविक हॉल तिकिटांमधील चुका महाविद्यालयांनीच सुधारणे आवश्यक असताना, महाविद्यालये विद्यार्थ्यांना बोर्डाच्या कार्यालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यासाऐवजी हॉल तिकीट दुरुस्तीच्याच कामात जात असल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयसीएल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना संताप व्यक्त केला असून, महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बोर्डाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार हॉल तिकिटावरील दुरुस्तींविषयी प्री लिस्ट कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आली होती, तरीसुद्धा त्यामध्ये बदल न केल्याने चुका आढळून येत आहेत. शाळा, महाविद्यालयाकडून झालेल्या चुकांमधील दुरुस्तीकरिता संबंधित शाळा-महाविद्यालयांच्या वतीने दुरुस्ती संदर्भात बोर्डाला अर्ज सादर करणे आवश्यक असून, त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून दुरुस्तीच्या ठिकाणी मुख्याध्यापकांची सही व शिक्का असणे, आवश्यक असल्याची माहिती बोर्डाने दिली.पालकांनी याविषयी महाविद्यायाच्या निष्काळजीपणावर टीका केली असून, विद्यार्थ्यांनी अभ्यास कधी करायचा? बारावी हा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असून, यामध्ये कोणतीही रिस्क घेण्यास विद्यार्थी तयार नसतात. अशा वेळी हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता मात्र विद्यार्थ्यांना तासन्तास उभे राहावे लागत असून, महत्त्वाचा वेळ वाया जात असल्याची प्रतिक्रिया पालक रवींद्र सावंत यांनी व्यक्त केली. ऐनवेळी हॉल तिकिटातच त्रुटी आढळल्याने विद्यार्थ्यांना गोंधळ उडाला आहे. फोटो, नाव, विषय, लिंग, माध्यम यामध्ये साम्यता नसल्याने अभ्यासाची तयारी सोडून त्रुटी निस्तारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. या प्रकरणी कॉलेज विभागीय मंडळाला, तर विभागीय मंडळ विद्यार्थी व कॉलेजला दोषी ठरवत असल्याचे चित्र दिसून येते.महाविद्यालयांकडून लूटहॉल तिकिटावरील बदलांकरिता विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालयांची चूक असल्याने १०० रुपये शुल्क जमा करण्याची जबाबदारी सर्वस्वी महाविद्यालयांवर असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी, तसेच पालकांची लूट केली जात असून एका बदलासाठी ३०० रुपये दर आकारले जात असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. आमची चूक नसतानाही आम्ही अतिरिक्त शुल्क का भरावे? असा संताप अपर्णा मोरे या विद्यार्थिनीने व्यक्त केला आहे. हॉल तिकिटावरील दुरुस्तीकरिता महाविद्यालयात अर्ज करण्यासाठी भली मोठी रांग आहे आणि यात पूर्ण दिवस वाया जात असून, गेले दोन दिवस मी कॉलेजला खेटा मारत असल्याचेही अपर्णाने स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी स्वत:च आॅनलाइन पद्धतीने फॉर्म भरले असून, यामध्ये मंडळाची काही चूक नाही. महाविद्यालयांनी कव्हरिंग लेटरसह अर्ज आणि हॉल तिकिटाची झेरॉक्स सोबत जोडून मंडळाला सादर करणे आवश्यक आहे. नवीन हॉल तिकीट विद्यार्थ्यांना दिले जाणार नाही. मात्र, मंडळाकडे दुरुस्तीची नोंद केली जाईल. महाविद्यालयांना पूर्व यादी पाठविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बदल न केल्याने हा गोंधळ उडाला आहे. याकरिता महाविद्यालयाने १०० रुपये अतिरिक्त शुल्क जमा करणे आवश्यक आहे.- डॉ. सुभाष बोरसे,सचिव, शिक्षण मंडळ, मुंबई

टॅग्स :examपरीक्षाNavi Mumbaiनवी मुंबई