शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीच्या सोनपावलांनी बाजारात उत्साह; खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 23:16 IST

गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळीनंतर कोरोना महामारी संकटाचा सामना केल्यानंतर आता मोकळा श्वास घेत, बाजारात उत्साहाने खरेदी करण्यासाठी महिला भगिनी उतरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

पेण : कोरोनाचे भय दूर सारून मार्गशीर्ष महिन्यांत श्री महालक्ष्मी देवीच्या व्रतोपासनेचा प्रारंभाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सकाळपासून महालक्ष्मीची पूजाविधीचे सामानाची खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळीनंतर कोरोना महामारी संकटाचा सामना केल्यानंतर आता मोकळा श्वास घेत, बाजारात उत्साहाने खरेदी करण्यासाठी महिला भगिनी उतरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. महालक्ष्मी देवीच्या सोनपावलांनी बाजारात उत्साह जाणवत होता. भाव तिथे देव आणि श्रद्धेला मोल नसते. मातृसत्ताक संस्कृतीचा आदर आपला समाज नेहमीच करतो. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूर निवासिनी माता महालक्ष्मी देवीचा वरदहस्त आपल्या राज्यावर आहे. मार्गशीर्षातील व्रतोपासनेची श्रद्धा भक्तिभाव यातूनच उदयास आला असणार, महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असल्याने प्रत्येक ऋतूत हा भक्तिभाव बहरतो. मार्गशीर्ष महिना याला अपवाद नसावा. बाजारात आज पूजा साहित्य, पंचाअमृत, फळे, फुले, देवीचा साजशृंगार, फायबरचे महालक्ष्मी देवीचे मुखवटे, प्रसादाचे सामान, भाजीपाला यासह किराणा मालाची खरेदी करताना महिलामध्ये बाजारात उत्साह जाणवत होता. आवाक्यात असणारे वस्तू व सामानाचे दर व भाज्यांचे दर घसरल्याने मार्गशीर्षातील उपासनेचा पहिल्या गुरुवारचे समाधान या भक्तिमय वातावरणात दिसून येत होते.