शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बेचकीच्या दगडाने पक्ष्यांचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:12 IST

काही लहान मुले खेळ म्हणून या पक्ष्यांना आपल्या बेचाकीच्या दगडांनी भक्ष्य बनवीत आहेत. ​​​​​​

मोहोपाडा : चैत्राच्या आगमनाने निसर्गात कमालीचा बदल घडत असल्यामुळे वृक्षाला आलेली नवसंजीवनी त्याचबरोबर आलेली दुर्मीळ आणि रसाळ फळे खाण्यासाठी अनेक पक्षी येत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी हे पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर भ्रमंती करीत निसर्गात तयार झालेला रानमेवा खाण्यासाठी अनेक ठिकाणांचे पक्षी वास्तव्याला येत असतात. शिवाय रसाळ आणि दुर्मीळ फळे मिळत असल्याने या पक्ष्यांची भूक भागली जाते. मात्र हेच त्यांच्या मुळावर उठत आहे. काही लहान मुले खेळ म्हणून या पक्ष्यांना आपल्या बेचाकीच्या दगडांनी भक्ष्य बनवीत आहेत.सध्या रानात विविध प्रकारची तयार झालेली फळे खाण्यासाठी पक्षी येत आहेत. झाडावरील फळ खाण्यात गुंग असलेल्या या पक्ष्यांवर एखादा दगड त्याच्या जीवाशी खेळत आहे, तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने हे पक्षी गावात येताच त्यांना बंदिस्त केले जाते. तसेच यांचा फायदा ही मुले उचलत आहे. या सर्व कारणावरून पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना पाण्याचे दोन थेंब त्यांची तहान शांत करीत असतात. मात्र, पाणी पिण्यासाठी आलेले पक्षी या बेचकीच्या हातून शिकार होत असतात.