शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पेणमधील आदिवासी महिलांना काजूगरातून मिळतोय रोजगार

By admin | Updated: April 12, 2016 00:57 IST

कोकणचा मेवा सर्वांनीच खावा, शुद्ध, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी हा रानमेवा चैत्रापासून सुरू होतो. तो आषाढ मासापर्यंत याची लज्जत सामान्यांची रुची भागविते. आंबा, काजू, फणस, कोकम

पेण : कोकणचा मेवा सर्वांनीच खावा, शुद्ध, पौष्टिक, बलवर्धक व आरोग्यदायी हा रानमेवा चैत्रापासून सुरू होतो. तो आषाढ मासापर्यंत याची लज्जत सामान्यांची रुची भागविते. आंबा, काजू, फणस, कोकम, करवंद, जांभूळ व अन्य डोंगराळ फळांचा बहर ही चैत्र पालवीची हमखास नैसर्गिक देण आहे. सध्या बाजारात ओल्या काजूगराला मोठी मागणी आहे. यामुळे आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.कोकणच्या भूमीवर काजूच्या झाडांची विपुलता आहे. या काजूगराची मागणी हॉटेल व्यावसायिकसुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. मात्र आदिवासी महिलांचा रोख पेणच्या सकाळ, सायंकाळच्या बाजारावरच असतो. दररोज ३० ते ३५ आदिवासी महिला छोट्या टोपल्यात काजूगर बिया घेवून मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर बसतात. धारदार विळ्याने बिया कापून त्यातील अर्धे अर्धे ओले काजूगर १५ ते २० नग याप्रमाणे हिरव्या पानावर काजूगराचा वाटा मांडून विक्रीसाठी ठेवतात. प्रत्येकी ३५ ते ४० रुपये दराने त्यांची विक्री होते. दिवसाकाठी एक आदिवासी महिला या ओल्या काजूगर विक्रीतून सुमारे ८०० ते १००० रुपयांची विक्री करते. अशा प्रकारे ३० ते ३५ या महिला तीन ते चार महिन्यांसाठी ओल्या काजूगरातून चांगली आर्थिक कमाई होत असते. सध्या कोकणचा डोंगराळ रानमेवा बाजारात विपुल प्रमाणात उपलब्ध होत असून यामध्ये शाकाहारी व मांसाहारी जेवणामध्ये ओल्या काजूगराचा समावेश मोठ्या प्रमाणात करण्यावर भर असतो. रानमेवा शारीरिक धनसंपदेस बळ देणारा व बौद्धिक क्षमता वाढविणारा असल्याने ओल्या काजूगराचा छोटासा वाटा ग्राहकांकडून हमखास खरेदी केला जात आहे. हेच कोकणच्या प्राकृतिक संपदेचे वैशिष्ट्य आहे. (वार्ताहर)