शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर 

By निखिल म्हात्रे | Updated: February 13, 2024 14:06 IST

ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती.

अलिबाग - ‘व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन संकेतस्थळावर खरेदीसाठी 40 ते 80 टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात येत आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. 14 फेब्रुवारीला ग्राहकांनी अधिक खरेदी करावी यासाठी विविध खरेदी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती.

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये समाजमाध्यमांच्या वाढलेला प्रभावामुळे ‘व्हॅलेनटाइन डे’च्या शुभेच्छा समाजमाध्यमांवर संदेश पाठवून देण्यात येत असल्या तरी बाजारपेठेत खास भेटवस्तू आणि गुलाब खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी कायम आहे. गुलाब खरेदी करतानाही ‘टॉप सिक्रेट’ आणि डच जातीच्या गुलाबांची मागणी वाढली असल्याचे फूलविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या प्रेमदिवसाच्या निमित्ताने तरुणांपासून वृद्धांपर्यंत भेटवस्तूंच्या दुकानात कोणीच फिरताना दिसत नव्हते.

एरव्ही बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असतानाच संकेतस्थळावर विविध सवलती असल्याने ग्राहकांनी आँनलाईन खरेदी करणे पसंत केले. संकेतस्थळावर कपडे, भेटवस्तूंबरोबर फुलांची खरेदीही करण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांवर तीस ते चाळीस टक्के सवलत देण्यात येत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कागदात गुंडाळलेले आणि विशिष्ट पद्धतीने सजवलेले गुच्छ ऑनलाइन उपलब्ध आहेत. अगदी 240 रुपयांपासून या गुच्छांची किंमत आहे.बाजारपेठेत टॉप सिक्रेट, डच गुलाब -

व्हॅलेंटाईन्स डे’जवळ आल्याने बाजारपेठेतील गुलाब फुलांची आवाक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र गुलाबांच्या फुलांचे दर हे दरवर्षीसारखेच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. लाल रंग असणाऱ्या चायना जातीच्या २० गुलाबांचा गुच्छाची किंमत ८० रुपये आहे तर गुलाबी रंगांच्या चायना जातीच्या २० गुलाबांच्या गुच्छाची किंमत ५० रुपये आहे. भारतीय जातीच्या ६ गुलाबांचा गुच्छाची किंमत ३० रुपये आहे. एकंदरीतच १० ते १५ रुपयांपासून गुलाबांच्या गुणवत्तेनुसार गुलाबांची किंमत असते. टॉप सिक्रेट आणि डच यासारख्या जातीच्या गुलाबांची मागणी सध्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, असे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेalibaugअलिबाग