शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संकटकाळी हेल्पलाइनची मदत; रेल्वे प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:23 IST

रेल्वे प्रवाशांना दिलासा : गुन्ह्यांमध्येही काहीशी घट

सुनील घरतपारोळ : रेल्वे प्रवासात प्रवाशांवर येणाऱ्या संकटकालीन माहितीसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे हेल्पलाइन सुरू केली. आता हा हेल्पलाइन नंबर संकटकाळी रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा ठरू लागला आहे.

प्रवासात अचानक येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी, संभाव्य गुन्ह्यांना रोखण्यासाठी, प्रवाशांतील भांडणांवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे गाड्यांमध्ये घडणारे गुन्हेही काही प्रमाणात घटले आहेत.बाका प्रसंग आल्यावर अनेकांना पोलिसांची मदत आवश्यक असते. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यावर तक्रार करताच तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रवास करीत आहात तेथील जवळील पोलीस तक्रारदाराच्या नंबरवर संपर्क करून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात.

रेल्वेस्थानकात असलेल्या पोलीस ठाण्यातून चांगला अनुभव आला नसल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी कंट्रोल रूम अथवा हेल्पलाइनला संपर्क करावा. त्यामुळे हे कॉल रेकॉर्ड होतात तसेच त्यानंतर प्रवाशांना थेट मदत मिळवून देणे सोपे होते. त्यासाठी प्रवास अर्धवट सोडण्याची गरज नसते. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी स्वतः प्रत्येक कॉलवर लक्ष ठेवून असल्याने तक्रारीचा कॉल आल्यानंतर मदत पोचली किंवा नाही याची माहिती अधीक्षक घेत असतात.

त्यामुळे तक्रारदाराला मदत लवकर पोहोचू शकते; तसेच प्रत्येक मार्गावर २४ तास सुरू असलेल्या गस्तीपथकालादेखील याची माहिती दिली जाते. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील पोलिसांसह ही टीमदेखील तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मदत करते. प्रवासादरम्यान पाकीट मारणे, बॅगेतून दागिने-पैसे लुटून नेणे, चालत्या रेल्वेतून खिडकीत बसलेल्यांचे दागिने हिसकावणे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. पाकीट व मोबाइल चोरीला जाण्याच्या घटना तर सर्रास घडतात.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे