शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उरणातील जासई,चिरनेर, दिघोडे ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 15:10 IST

येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या तीनही ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता ६ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे.

उरण - राज्य निवडणूक आयोगाने  राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका ५ नोव्हेंबर रोजी घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामध्ये उरण तालुक्यातील जासई,चिरनेर आणि दिघोडे या तीन ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.   

जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती  सन २०२२ मध्ये  निवडणूका झालेल्या नाहीत. त्या  ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणूक होणार आहे. उरण तालुक्यातील  जासई, चिरनेर आणि दिघोडे  या तीन ग्रामपंचायतींचा समावेश असुन सध्या या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासक सांभाळत आहेत.

येत्या ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या तीनही ग्रामपंचायतच्या निवडणूकीसाठी आचारसंहिता ६ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहे. या  ग्रामपंचायतीच्या नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी १६ ऑक्टोबर ते  २० ऑक्टोबर पर्यंत तारीख देण्यात आली आहे.तर नामनिर्देशन पत्राची छाननी  २३ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख २५ ऑक्टोबर रोजी २ वाजेपर्यंत असणार आहे.तर मतदान हे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७-३० ते सायंकाळी ५-३० पर्यंत होणार असून  मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक