शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींच्या ३१ आॅगस्टला निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:39 IST

१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या पाच ग्रामपंचायतींच्या मुदत या वर्षअखेरीस संपत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.त्यानुसार ९ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे, तर १९ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, २१ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वैध ठरलेले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीमध्ये मतदान घेतले जाईल. तर मतमोजणी ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.आरक्षित असलेल्या जागाच् ३१ आॅगस्ट रोजी निवडणूक होत असलेल्या १७ सदस्यीय नेरळ ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचपदाकरिता अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे, तर उमरोली या १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.च्वाकस या ११ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी नागरिकांचे मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. त्याच वेळी वरई या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद सर्वसाधारण असून, तिवरे या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंच अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक