शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील ९० ग्रा.पं.चा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.

पेण : मार्च २०१९ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या सुमारे २६४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान या ग्रामपंचायतीसाठी होणार असून बुधवारी २३ जानेवारीपासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.राज्यभरातील सहा प्रशासकीय विभागातील कोकण, नाशिक, पुणे औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक कोकण विभागातील १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक ठरणाºया आहेत. पेणमधील पाच मोठ्या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असल्याने राजकीय रणांगण तापणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमात २५ जानेवारीला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, निवडणूक उमेदवारी अर्ज मागविण्याचा व सादर करण्याची तारीख ४ ते ९ फेब्रुवारी २०१९ या दिवसात सकाळी १० ते दु. ३ वाजेपर्यंत आहे. उमेदवारी अर्जाची छाननी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाननी संपेपर्यंत, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १३ फेब्रुवारी रोजी दु. ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप दु. ३ वाजल्यानंतर होईल. मतदान २४ फेब्रुवारी रोजी रविवार सकाळी ७.३० ते ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २५ फेब्रुवारी रोजी संबंधित ग्रामपंचायतीच्या तालुक्याच्या ठिकाणी जाहीर होईल.पेणमधील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकानिवडणूक होणाºया राज्याच्या प्रशासकीय सहा विभागातील कोकणातील सर्वाधिक १३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सर्वाधिक रायगडमधील ९० ग्रामपंचायत, रत्नागिरी ४० तर सिंधुदुर्ग १ अशाप्रकारे सहभाग आहे. पेण तालुक्यातील मोठ्या संख्येने मतदार असलेल्या वढाव, उंबर्डे, शिर्की, कांदळे व शिहू या पाच ग्रामपंचायतीमध्ये २४ फेब्रुवारी रोजी मतदान होत असल्याने पेण अंतोरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपाठोपाठ या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे.जिल्ह्यातील ९० ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवडद्वारे होणारी ही निवडणूक येणाºया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आहे.