शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पेण तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका

By admin | Updated: April 2, 2016 02:42 IST

ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्यभरात जाहीर झाला असून, या अनुषंगाने पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सात जागांसाठी काँग्रेस

पेण : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्यभरात जाहीर झाला असून, या अनुषंगाने पेण तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील सात जागांसाठी काँग्रेस पक्षातर्फे नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँगे्रस युवा नेते व राजिप माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील तसेच कोपर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी सदस्य नवनाथ म्हात्रे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असूनही सार्वत्रिक आणि आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीमधील १५ जागांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी निरुत्साही वातावरण पेण तहसील कार्यालयात पाहावयास मिळाले.पेणची कोपर ग्रामपंचायत सध्या शेकापच्या ताब्यात आहे. यापूर्वी कोपरवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. आता पुन्हा कोपर ग्रामपंचायत ताब्यात घेण्याच्या काँग्रेसतर्फे जोरदार हालचाली सुरू आहेत. सत्तास्थानी असलेल्या शेकापतर्फे शनिवारी अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज सादर केले जातील. मात्र येथील दोन्ही पक्षांत कांटे की टक्कर आहे. एकूण सात जागांपैकी कोणता पक्ष चार जागा जिंकतो, यावरून दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करून शेकापला चुचकारले आहे. प्रत्यक्ष सामना ६ एप्रिलनंतर राजकीय प्रचारात होणार आहे. १७ एप्रिलला यासाठी मतदान होणार असून, ८ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राजकीय प्रचारास प्रारंभ होईल, असे चित्र आहे. दुसरीकडे मात्र ज्या ८ ग्रापंचायतींत रिक्त १५ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत, त्या ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपर्यंत निरुत्साही वातावरण होते. उद्या उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. ४ एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी सकाळी ११ वाजता, तर ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होऊन रणांगणावरचे खरे चित्र स्पष्ट होईल. १७ एप्रिलला मतदान व १८ एप्रिलला निकाल असा निवडणूक कार्यक्रम आहे. (वार्ताहर)या जागांसाठी पोटनिवडणूकबेलवडे, अनुसूचित जमाती स्त्री राखीव ३ जागा, आंबिवली अनुसूचित जमाती स्त्री १ जागा, शेडाशी नामप्र स्त्री १, अनुसूचित स्त्री एक व नामप्र/पुरुष १ जागा अशा एकूण ३ जागा निधवली, नामप्र १ जागा, वरप नामप्र २ जागा, वरप नामप्र १ जागा, करोटी नामप्र एक जागा, वरेडी अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती स्त्री राखीव दोन जागा अशा एकूण तीन जागा व महलमिऱ्या डोंगर सर्वसाधारण स्त्री राखीव एक जागा अशा एकूण १५ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.