शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

माणगावची शैक्षणिक भरारी

By admin | Updated: April 7, 2016 01:25 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याने उत्तुंग शैक्षणिक भरारी घेतली आहे. या तालुक्यातील ३१० पैकी १०० शाळा २०१५-१६ मध्ये प्रगत झाल्या आहेत.

नितीन देशमुख,  माणगावप्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्याने उत्तुंग शैक्षणिक भरारी घेतली आहे. या तालुक्यातील ३१० पैकी १०० शाळा २०१५-१६ मध्ये प्रगत झाल्या आहेत. ३० शाळा डिजिटल झाल्या आहेत. १५ एप्रिलपर्यंत १०० टक्के शाळा डिजिटल होतील, असा विश्वास गट शिक्षण अधिकाऱ्यांना आहे.यापूर्वी आपण वर्तनवादी पद्धतीने शिकवत होतो. प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करून मुलांना शिकवत होतो. त्यामुळे म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. यासाठी नवीन पद्धत आणण्यात आली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना म्हणजेच लोकसहभागातून शासकीय अनुदान न घेता ज्ञानरचनावाद पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. या अंतर्गत माणगाव तालुक्यात आतापर्यंत १०० शाळा पूर्ण प्रगत झाल्या आहेत. शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी आकर्षण निर्माण व्हावे, मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, अशा पद्धतीने याची रचना करण्यात आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञ एडगर डेल यांच्या म्हणण्याप्रमाणे वाचलेले १० टक्के लक्षात राहते, तर २० टक्के ऐकलेले, ३० टक्के पाहिलेले, ५० टक्के ऐकलेले व पाहिलेले, ७० टक्के बोललेले व ९० टक्के ग्रुपमध्ये चर्चा केलेले. या त्रिकोणाच्या सिद्धांताचा वापर या पद्धतीत केला आहे. अमेरिका व जपान या प्रगत देशांत ही पद्धत आधीपासून वापरण्यात येत आहे. विद्यार्थ्याला अडचण निर्माण झाल्यास समवयस्कर विद्यार्थी त्याला मदत करतात. शिक्षक विविध साहित्याचा वापर करून शिकवतात. त्यामुळे एका शब्दापासून अनेक शब्द कसे बनवायचे, वाक्ये कशी बनवायची हे चांगले समजते. केंद्रप्रमुख सूर्यवंशी सांगतात, साखळेची वाडी या दुर्गम भागातील विद्यार्थी इंग्लिशमधून भाषण करू लागले आहेत. मुलांना बहुपर्यायी उत्तरे येऊ लागली. वावोशी शाळेतील दुसरीतल्या मुली कोटीपर्यंतची संख्या वाचू लागल्या.