शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

शैक्षणिक परवड थांबणार

By admin | Updated: December 16, 2015 00:57 IST

स्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना

- आविष्कार देसाई,  अलिबागस्थलांतरित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबावी यासाठी रायगड जिल्ह्यात १२ हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. या वसतिगृहांमध्ये ३९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रे देण्यात येणार असल्याने त्यांच्या कुटुंबांचे स्थलांतर झाले, तरी त्यांना आता राज्यभरातील शिक्षणाची कवाडे खुलीच राहणार आहेत.सर्वांना मोफत शिक्षण देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारवर आहे. गरीब, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी, वीटभट्ट्यांवर काम करणारी स्थलांतरित कुटुंबे मोठ्या संख्येने असल्याने त्या कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. शिक्षणाचा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला जात होता. यावर उपाययोजना म्हणून सरकारने आॅगस्ट महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने सर्वेक्षण केले. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एक हजार १५० विद्यार्थ्यांना कुटुंबाच्या व्यवसायामुळे स्थलांतरित राहावे लागत असल्याचे समोर आले होते. अशा स्थलांतरित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने हंगामी निवासी वसतिगृहे सुरु केली आहेत. रायगड जिल्ह्यात १८ हंगामी निवासी वसतिगृहांना मान्यता देण्यात आली असून नोव्हेंबरपासून १२ हंगामी वसतिगृहे सुरुही करण्यात आली आहेत. त्यामध्ये सुधागड तालुक्यात चार आणि महाड तालुक्यातील आठ हंगामी वसतिगृहांचा समावेश आहे. त्यामध्ये १९९ मुले आणि १९७ मुली असे एकूण ३९६ विद्यार्थी पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले.एका विद्यार्थ्यामागे सरकार एक हजार ३६७ रुपये खर्च करणार आहे. त्यामध्ये दुपारचे आणि रात्रीचे जेवण, चहा-नाष्टा, तेल, साबण, टुथपेस्ट अशा गरजेच्या वस्तू देणार असल्याचेही बडे यांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी रात्री नातेवाइकांकडे राहणार आहेत त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हंगामी निवासी वसतिगृहात राहायचे असेल, त्यांच्या राहण्याची व्यवस्था वसतिगृहात करण्यात येणार आहे. ३१ मार्च २०१६ पर्यंत हंगामी वसतिगृह सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.