शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपताच तलाव कोरडा, वनविभागाने चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 02:51 IST

नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला.

कांता हाबळे नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी तलाव खोदला आहे. तेथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने हा तलाव पावसाळा संपताच कोरडा पडला आहे. वनविभागाने कोणतीही शहानिशा न करता, नियोजन न करता, तलावासाठी चुकीची जागा निवडली, असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनविभागाने जिल्हा नियोजन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून वन तलाव बांधले; परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच नद्या, ओढे वाहत असताना वन विभागाने सापेले येथे बांधलेले ३३ बाय ३३ मीटर्सचे वन तलाव अगदी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत, वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या निकृष्ट कामामुळेच तलावाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.कर्जत तालुक्यातील तांबस या महसुली गावालगत असलेल्या सापेले गावाला लागून ६२ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. वनविभागाने डोंगर उतारावर हा तलाव बांधला आहे. तर तलावाच्या खालच्या बाजूचे क्षेत्र उताराचे असून, राजनाल्याच्या क्षेत्राखाली जमिनी येत असल्याने जमीन बाराही महिने पाण्याखाली येतात. शिवाय राजनाल्याच्या खालच्या बाजूला वनविभागाच्या जमिनीचे क्षेत्र असूनही अधिकाºयांनी तलावासाठी ती जागा का निवडली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाची पाहणी शिवसेना विभागप्रमुख योगेश दाभाडे, कृष्णा जोशी, मनोज पवार, सुनील मसणे, बाजीराव दळवी, राजेश शेळके, अनिल जाधव यांनी केली.