शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बिरवाडीत प्रदूषणामुळे काळ नदीपात्रातील पाण्याचा रंग बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:31 IST

चौदा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करूनही समस्या जैसे थे; ग्रामपंचायतीकडून उपाययोजना सुरू

- दीपक साळुंखे बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडीनजीकच्या काळ नदीपात्राच्या पाण्याला प्रदूषणामुळे काळा रंग आला आहे. त्यामुळे परिसरातील चौदा गावांच्या नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार पत्रव्यवहार करून देखील समस्या जैसे थे असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.बिरवाडी काळ नदीपात्रावर कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडवून जॅकवेलद्वारे चौदा गावातील नळपाणी पुरवठा योजना कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कारखान्यांचे प्रदूषित सांडपाणी व नागरी वस्तीतील सांडपाणी बिरवाडी काळ नदीपात्रात मिसळते. परिणामी नदीवरून कार्यरत असणाऱ्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असणारे चौदा गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ अरु ण घाडगे यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, बिरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचाºयांमार्फत बिरवाडी काळ नदीपात्रातील पाणी काळ्या रंगाचे झाल्याची माहिती ८ डिसेंबर रोजी प्राप्त झाली असून नेमके पाणी कशामुळे काळे झाले याकरिता पाण्याचे नमुने तपासणीकरिता आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उपाययोजना ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.सांडपाणी नदीत मिसळलेप्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी प्रकाश ताटे यांच्याजवळ संपर्क साधला असता बिरवाडी ग्रामपंचायतीसह काळ नदीपात्रावरील ग्रामपंचायतींना नोटिसा बजाविण्यात आल्या असून नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळू नये याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच नागरी वस्तीतील सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याकरिता एमआयडीसीने यंत्रणा उभारावी अशी मागणी ग्रामपंचायतींकडून संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे करण्यात करण्यात आली आहे. मात्र या मागणीची पूर्तता अद्याप झाली नसल्याने नागरी वस्तीतील सांडपाणी नदीपात्रात मिसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचे क्षेत्राधिकारी ताटे यांनी स्पष्ट केले.महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला आलेल्या काळा रंग चिंतेची बाब असून या प्रकरणी संबंधितांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बिरवाडीमधील नागरिक मयूर रामराव मोरे यांनी केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणRaigadरायगड