शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानात अपघाताच्या संख्येत घट

By admin | Updated: January 23, 2017 05:46 IST

रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी केला. सोमवारी २३ जानेवारीला या अभियानाची सांगता होत आहे.या कालावधीत जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात रोखणे यासाठी विविध, शिबीरे, जनजागृती रॅली काढण्यात आल्या होत्या. काही शाळा, कंपन्यांमध्ये पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. त्यांला चांगला प्रतिसाद लाभल्याचे म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अभियानात नागरिकांसह सामाजिक संस्थांचा उर्स्फूतपणे सहभाग मिळत नसल्याची खंतही म्हात्रे यांनी व्यक्त केली. २०१५ ते २२ जानेवारी २०१७ या कालावधीत वाहतूक विभागाने १०६ शाळांमध्ये वाहतुकी संदर्भात उपक्रम राबवले आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत डंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ४०० केसेस करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी ते २३ जानेवीरी २०१७ या कालावधीत सर्वत्र रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. अभियान सुरु होण्याआधी दररोज अपघातात एकाचा तरी मृत्यू होत होता, असेही म्हात्रे यांनी सांगितले. युवकांनी अशा राष्ट्रहीताच्या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सामिल होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रानेही यामध्ये सहभागी होणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वाहतुक पंधरवड्या निमीत्ताने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. पीयुसी सेंटर यांचीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.