शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवामुळे कोरोनाच्या काळातही आनंदाला आले उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:55 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश उत्सवाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. मुंबई, ठाणे, बोरीवली, विरार व पुणे येथे राहणारे चाकरमानी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावीच आलेले आहेत.

-गणेश चोडणेकर गणेशोत्सव सण हा कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाला कामानिमित्त बाहेरगावी, तसेच देश-परदेशात असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. १० दिवस येथे प्रसन्न वातावरण असते, तर गावे गजबजलेली असतात. महाराष्ट्रातील इतरही विभागांत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो. याच काळात गौराईचीही स्थापना केली जाते. त्यामुळे गौरी-गणपतीचा सण असेही संबोधले जाते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश उत्सवाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. मुंबई, ठाणे, बोरीवली, विरार व पुणे येथे राहणारे चाकरमानी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावीच आलेले आहेत. मुरुड तालुक्यातील मुंबई, ठाणे या शहरांत कामास असलेल्या माणसांची संख्या हजारोंच्या वर असल्याने, सर्वच जण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात शासनाच्या नियमाप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. जून महिन्यातच गणपती चित्रशाळांकडे आॅर्डर बुक केल्याने आपल्या गणरायाचे रंगकाम कसे केले आहे, हे पाहण्यासाठी लोक चित्रशाळांतही जाताना दिसत आहेत.येत्या २२ आॅगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मूर्ती बनविण्यास कारागिरांनी सुरुवात केली होती. त्यांच्या कामाला आता चांगलीच गती आली आहे. मूर्ती कारागीर शेवटचा हात फिरविण्याच्या कामात मग्न आहेत. अनेक कारागिरांकडे मूर्तींचे रंगकामही पूर्ण झाले आहे. डायमंड चमकी, सिल्व्हर आॅइल रंगाने मूर्ती सजविण्यात कारागीर व्यस्त आहेत. गणेशमूर्तींमध्ये दरवर्षी भक्तांचा ट्रेण्ड बदलत असतो. या वर्षी लालबागचा राजा, मयूरासन, फेटेवाला गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती अशा असंख्य मूर्ती भाविकांना आकर्षित करीत आहेत. वस्त्र-अलंकारांनी सजलेल्या मूर्तीही पसंतीस पडत आहेत. मुरुड शहरात फक्त शाडूच्या गणेशमूर्तींना खूप मागणी आहे. या वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्तिकारांनाही बसला आहे, तसेच गणेशभक्तही अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा उत्साह पाहायला मिळणार नाही. मूर्तिकार छोट्या मूर्ती बनविण्यावरच जास्त भर देत आहेत. तीन फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीच या वेळी बनविल्या जात आहेत.मुरुड नगर परिषदेने गणपती उत्सवाबाबत नियमावली तयार केली असून, त्याप्रमाणे लोक त्याची अंमलबजावणी करणार आहेत. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना याबाबत सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी उत्साह अतूट असला, तरी शासनाच्या नियमांचे पालन करून गणरायाचे आगमन व विसर्जन होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGanesh Mahotsavगणेशोत्सव