शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:18 IST

प्रशासनाकडून तयारी पूर्ण; अलिबाग, पेण, श्रीवर्धन, पोयनाडच्या सरकारी रुग्णालयांत रंगीत तालीम

 

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कोविड १९ लसीकरण मोहिमेला लवकरच सुरुवात होत आहे. त्या अगोदर लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून ड्राय रन घेतला जात आहे. शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड १९ लसीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेला कशा पद्धतीने लस द्यायची आहे, याची माहिती व्हावी, यासाठी ही रंगीत तालीम आहे. जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, पेण या ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने कोविड १९ लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून, आरोग्य यंत्रणाही तयारीत आहे. जिल्ह्यात ५ लाख लस दाखल झाल्यानंतर त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात भविष्यात ५२ ठिकाणी केंद्रे उभारणारजिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील साडेआठ हजार लाभार्थ्यांची यादी आरोग्य यंत्रणेने तयार केली आहे. दररोज १०० लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जाईल. यासाठी ड्राय रन होत आहे. प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थी लस घेणार आहेत. जिल्ह्यात भविष्यात ५२ ठिकाणी केंद्र उभारून लसीकरण केले जाणार आहे. लाभार्थ्यांची याची कोव-इन या अ‌ॅपवर नोंदणी केली .

पाच लाख लसी मिळणार - पालकमंत्रीरायगड :  राज्यात कोविड १९ लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. त्याअगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम सर्व सरकारी रुग्णालयांमधून घेतली जात आहे. जिल्ह्यासाठी पाच लाख कोरोना लस येणार आहेत. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे, असे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. सरकारच्या आदेशानुसार कोविड-१९ लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रंटलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेलाही लसीकरण मोहिमेची परिपूर्ण तयारी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्ह्यासाठी ५ लाख लस दाखल होणार आहेत. त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या वेळी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या