शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

धुण्याच्या पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा

By admin | Updated: May 25, 2017 00:22 IST

तालुक्यातील गोंडघर गावामध्ये नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत धुण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसळा : तालुक्यातील गोंडघर गावामध्ये नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत धुण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा पुरवठा पिण्यासाठी होत आहे. यामुळे गोंडघर ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास दोन हजार नागरिकांना आपले आरोग्य धोक्यात घालून हे पाणी प्यावे लागत आहे. नळपाणी पुरवठा योजना गोंडघरमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी २० ते २५ वर्षांपूर्वी एक विहीर बांधण्यात आली होती. आजही याच विहिरीतून गोंडघर गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो, परंतु ही विहीर जेथे आहे त्याला लागूनच एक ओढा वाहतो. त्या ओढ्यामध्ये अनेक जण आपली गुरे-ढोरे धुतात, तसेच कपडे धुण्यासाठी याच ओढ्याचा वापर केला जातो. त्यातच या विहिरीला एक भले मोठे भगदाड पडले आहे आणि ते नेमके या ओढ्याला लागूनच आहे. त्यामुळे या ओढ्यातील सर्व अशुद्ध पाणी या भगदाडामार्फत विहिरीत पडते. त्यामुळे विहिरीतील पाणी अशुद्ध होते. पुढे हेच पाणी संपूर्ण गोंडघर गावात पुरविले जाते. जरी साठवण टाकीमध्ये ग्रामपंचायतमार्फत क्लोरीनेशन केले जात असले तरी त्यामधील फक्त जीवाणू मरतात, परंतु गुरे ढोरे, कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे साबण किंवा पावडरमधील रासायनिक द्रव्ये तशीच्या तशी पिण्याच्या पाण्यात राहतात. या रासायनिक द्रव्ययुक्त पाणी प्याल्याने आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, असे पाणी प्याल्याने पचनसंस्थेशी निगडित आजार होतात, अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे. विहीर व आसपासच्या परिसरात, तसेच विहिरीलगत असलेल्या ओढ्यामध्ये कचरा, लहान मुलांचे डायपर पडलेले आहेत. जनावरे देखील त्या पाण्यात बसलेली असतात. हेच पाणी ओढ्यातून विहिरीला पडलेल्या भगदाडातून विहिरीत जात आहे.