शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:25 IST

जिल्ह्यात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांच्या झुंडी जवळपास प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दिसून येत आहेत

- जयंत धुळप अलिबाग : जिल्ह्यात मोकाट आणि आक्रमक कुत्र्यांच्या झुंडी जवळपास प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात दिसून येत आहेत, त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात तब्बल ११ हजार ५७८ नागरिकांना श्वानदंश झाला आहे. यावर जिल्हा प्रशासन वा स्थानिक यंत्रणांकडून कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत, त्यामुळे जिल्ह्यात श्वानदंशाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.गुरुवारी खालापूर तालुक्यातील चौक गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच वेळी तब्बल १२ जणांवर हल्ला केला. यात पिंकी परशुराम वाघमारे (४६), रामी पांडुरंग चौधरी (३५), यमुना रघुनाथ कदम (६१) आणि राधाबाई किसन सोनावणे (६५), या चार महिला अत्यंत गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका लहान मुलासह उर्वरित जखमींवर चौक येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. जवळपास दोन तास अत्ंयत आक्रमकपणे धुडघूस घालून, १२ जणांना चावलेल्या कुत्र्याला अखेर ठार मारल्यावर ग्रामस्थांनी नि:श्वास टाकला. गेल्या दोन वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या घरात घुसून एका बालकाचे मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याचा प्रसंग घडला होता. प्राणी संरक्षणाकरिता असलेल्या ‘पेटा’कायद्यामुळे मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांना ठार मारणे, हा जरी गुन्हा असला तरी माणसाला स्वत:चा जीव वाचविण्याकरिता अशा प्रकारचे पाऊल उचलावे लागले आहे.श्वानदंश झाल्यावर जी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथे उपचार केले जातात, तीच आरोग्य केंदे्र जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांची आश्रयस्थाने झाली असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, प्रसंगी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनाही कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागते. जिल्हा सरकारी रुग्णालयात रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती जाऊच शकत नाही. कारण रुग्णालयाच्या अपघात कक्षासमोरच्या मोकळ्या जागेत १५ ते २० कुत्रे वावरत असतात आणि नवीन माणूस पाहिला की जोरजोरात भुंकतात.>मोकाट कुत्र्यांना विष घालणे वा त्यांच्या बंदोबस्त करणे ही जुनी पद्धत आता ‘पेटा’या कायद्यांतर्गत करता येत नाही. नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम अलिबाग नगरपालिका क्षेत्रात एकदा राबविली होती; परंतु ती पुरेशी नाही. निर्बीजीकरणाची मोहीम किमान तीन महिन्यांतून एकदा होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरिता सद्यस्थितीत कोणतीही उपाययोजना नाही.- महेश चौधरी, प्रमुख, जिल्हा नगरपालिका प्रशासन>शहरात मोकाट कुत्र्यांना सहज उपलब्ध होणारे अन्न, विशेषत: चिकन, मटण आदीमुळे या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण शहरीभागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जेव्हा त्यांना हे अन्न उपलब्ध होत नाही, त्या वेळी ते एकमेकांवर हल्ले करू लागतात. त्याच दरम्यान कोणी माणूस आसपास आल्यास ते संघटितरीत्या त्या माणसावर हल्ले चढवतात, असे अनुभवास येते. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाता येतील असे पदार्थ पडणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे.- गंगाधर सावंत, ज्येष्ठ नागरिक>कुत्र्यांना आवरण्यासाठी आता ‘अ‍ॅनिमल ट्रॅप’जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीत भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. मोकाट कुत्रे रुग्णालयांच्या इमारतीमध्ये येऊ नयेत, याकरिता ‘अ‍ॅनिमल ट्रॅप’ ची योजना अमलात आणण्यात येत आहे. त्याकरिता एक लाख रुपयांचा निधी देखील आला आहे. ‘अ‍ॅनिमल ट्रॅप’अंतर्गत फिरते रोलर्स रुग्णालय इमारतीच्या प्रवेशद्वाराला लावण्यात येतील, त्यांस घाबरून कुत्रे रुग्णालयाच्या इमारतीत येणार नाहीत. ‘अ‍ॅनिमल ट्रॅप’अलिबागसह माणगाव, पेण, महाड आदी ठिकाणच्या सरकारी रुग्णालयांत येत्या महिन्याभरात बसविण्यात येतील.- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Raigadरायगडdogकुत्रा