शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टर सुनील ढवळे, जगदीश दगडे मेंढपाळासाठी ठरले देवदूत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:12 IST

दोन लहान मुलांनी बिया खाल्ल्याने उपचाराची गरज असताना केली मदत; आंबोट गावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क मोहोपाडा : मेंढपाळ हे पावसाळा ऋतूचे चार महिने सोडले तर उर्वरित महिने जिकडे बकऱ्यांसाठी चारा पाणी मिळेल तिकडे कुटुंबासह भटकंती करत फिरत असतात. असेच काही मेंढपाळ दरवर्षी तालुक्यातील खेड्यापाड्यात येऊन राहत असतात. बाका प्रसंग आला असता  डाॅक्टर सुनील ढवळे, जगदिश दगडे यांनी मदत केल्याने ते  देवदूत ठरले    बारामती येथील मूर्ती गावातील मेंढपाळ भीरु दगडू गलांडे (४०) हे ही आपल्या कुटुंबासह आंबोट या गावाबाहेरील माळरानावर राहत होते. मेंढ्यांना रानात चरण्यासाठी घेऊन गेले असता त्यांच्या दोन लहान मुलांनी सुप्रिया (८) व साहिल (६) यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी मित्र वसंत सदार यांच्या मदतीने मुलांना कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. परंतु, अत्यावस्थ असलेल्या मुलांवर कडाव केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्यास असमर्थता दर्शवली व‌ मुलांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने देखील रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे कारण सांगून मुलांवर उपचार करण्यास नकार दिल्याने त्यांनी मुलांना अनेक खासगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची विनंती केली. परंतु, खासगी दवाखान्यातील डाॅक्टरांनी ही त्यांच्या मुलांवर उपचार करण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात मुलांची तब्येत अधिकच बिघडत चालली होती आणि मुलांवर उपचार करण्यास कुणीही डाॅक्टर तयार होत नसल्यामुळे ते मुलांना घेऊन श्रीराम पुलावर रडत बसले होते व मुले वेदनेने विव्हळत लोळत पडली होती. त्याचवेळी सामाजिक कार्यकर्ते जगदिश दगडे श्रीराम पुलावरून जात असताना त्यांनी मुलांची होत असलेली तडफड पाहून मेंढपाळ भीरु गलांडे यांची विचारपूस केली त्यांनी विलंब न करता डाॅक्टर सुनील ढवळे यांना संपर्क करुन सर्व हकिकत सांगितली. 

वाचले मुलाचे प्राणजगदिश दगडे यांनी  नरेश बोरकर व भालिवडे यांच्या मदतीने मुलांना घेऊन डाॅक्टर ढवळे यांच्या हाॅस्पिटलमध्ये धाव घेतली. मुलांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डाॅक्टर सुनील ढवळे व त्यांच्या पत्नी डाॅक्टर ईश्वरी ढवळे यांनी मुलांवर तातडीने उपचार करुन दोन्ही मुलांचे प्राण वाचवले. रात्र झाल्यामुळे बाजारपेठेतील सर्व मेडिकल बंद होते परंतु अनुज सुरेश गायकवाड यांनी मेडिकल उघडून औषधे त्वरित उपलब्ध करून दिली.