शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणाच्या कामात दुटप्पी धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:38 IST

नागरिकांमधून संताप; कर्जत नगरपरिषदेच्या भूमिकेवर संशय

कर्जत : नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्व प्रभागवार एमएमआरडीएच्या निधीतून सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यांची कामे चालू आहेत. नऊ मीटर रुंदीचे रस्ते बनविताना नागरिकांच्या जागा बाधित होत आहेत. हे बांधकाम तोडत असताना कुणावर अन्याय तर कुणावर मेहेरबानी करत असल्याने नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर नगरपरिषद कार्यालयाच्या कंपाउंडची भिंतही रस्त्याला बाधा ठरत असल्याने भिंतीमुळे रस्ता कमी रुंदीचा होत असून भिंत तोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मुद्रे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक नगरपरिषदेने बनविले. सिमेंट काँक्रीटचा रस्ता व एका बाजूस गटार असे अंदाजपत्रक बनविले. हा रस्ता नऊ मीटर रुंदीचा होता. नऊ मीटर रुंदीकरणामुळे मुद्रे गावातील शेकडो लोकांच्या घराचा वाढीव भाग तुटत होता. त्यामुळे मुद्रे गामस्थ नगरपरिषदेवर मोर्चे आणत होते. २०१९ नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी या रस्त्याचे राजकारण केले. अखेर नगरपरिषदेच्या शेवटच्या महासभेत रस्ता आहे तसाच बनविण्याचा ठराव घेण्यात आला आणि रस्त्याचे काम सुरू केले. मात्र, त्यानंतरही नगरपरिषद प्रशासनाने पटेल, असगरअल्ली, डॉ. तिटकारे आदीना नोटीस देऊन त्यांच्या कंपाउंडच्या भिंत काढण्याच्या नोटिसा दिल्या.पटेल यांच्या इमारतीचा दोन्ही बाजूचा भाग बाधित होत आहे. मात्र, नगपरिषदेने नगरपरिषद कार्यालय ते टेकडीकडे जाणाºया बाजूची कंपाउंड भिंत पाडली. मात्र, अभिनव शाळेकडे जाणाºया रस्त्याकडील बांधकामाला अभय दिले. मुळात नगरपरिषद कार्यालयाची कंपाउंडची भिंत ही गटाराच्या बाहेर बांधली आहे. नगरपरिषदेने गटार आतमध्ये घेऊन तीन ते चार फूट जागा गिळंकृत केली आहे.कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयाशेजारी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम चालू आहे. आपली भिंत तुटू नये म्हणून पटेल यांना दिलेल्या अभयामुळे हा रस्ता व पुढे असणारा चौक कमी रुंदीचा झाला आहे.नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूलाच विठ्ठलनगरकडे जाणाºया रस्त्यावर लहान मुलांचे खासगी रुग्णालय आहे. याही रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम झाले आहे. येथील रस्ता अरुंद आहे, बाजूला तीन टपºया अनधिकृतपणे सुरू आहेत. त्यांच्यावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्यांना नगरपरिषदेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे.