शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीत डबल कंटेनरची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 00:10 IST

६७ % अधिक मालाची वाहतूक शक्य : पाच वॅगन गुजरातकडे रवाना 

मधुकर ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कउरण : गुजरात ते जेएनपीटीदरम्यान एकावर एक दुहेरी रचलेल्या डबल कंटेनर वाहून नेणाऱ्या मालवाहू रेल्वेची बुधवारी (३ मार्च) यशस्वी चाचणी झाली.  डबल स्टॅक केलेल्या ड्वार्फ कंटेनरच्या पाच वॅगन बुधवारी दुपारी १ वाजता गुजरात राज्यातील मेहसाणा येथे रवाना झाल्या. जेएनपीटी बंदरातून रेल्वेची कंटेनर वाहतुकीची क्षमता आणखी वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी एकावर एक दुहेरी रचलेल्या डबल कंटेनर वाहून नेण्याची योजना रेल्वेने आखली आहे. रेल्वेने एकावर एक रचून ठेवण्यात येणाऱ्या कंटेनरची वाहतूक करण्यासाठी कंटेनरची उंची ८ फुटांवरून कमी करून सहा फुटांपर्यंत केली आहे. दोन्ही कंटेनर मिळून उंची चार फूट कमी होणार आहे. यामुळे वाहतुकीसाठी मोडिफिकेशन केलेल्या वॅगनमधून विनाअडथळा कंटेनर मालाची वाहतूक करणे आणखी सुलभ होणार आहे. या डबल स्टॅकड् ड्वार्फच्या एका कंटेनरमधून ७१ टन मालाची वाहतूक होऊ शकते. तसेच ६७ % अधिक मालाची वाहतूक शक्य होणार आहे. यामुळे जेएनपीटी बंदरातून रेल्वे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार वाढ आहे. त्याचा सर्वाधिक फायदा व्यापारी, ग्राहकांना होणार आहे. त्यामुळे रेल्वेनेही रेल्वेद्वारा आयएसओ कंटेनर गाड्यांच्या तुलनेत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनर गाड्यांसाठी अतिरिक्त मालवाहतुकीसह मालवाहतूक शुल्कात १७ % सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. जेएनपीटी बंदरात ‘डेडिकेटेड ड्वार्फ कंटेनर डेपो’चे (डी-डेपो) व्यवस्थापन, देखभाल व संचालन करण्यासाठी ऑपरेटरची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या डेपोमध्ये आयएसओ एक्झिम कंटेनर डिस्टफ़्ड/रीस्टफ़्ड केले जातील आणि नंतर जेएनपीटीकडे किंवा जेएनपीटीतून बाहेर रेल्वेने पाठविण्यासाठी ड्वार्फ कंटेनरमध्ये पुन्हा रीस्टफ़्ड केले जातील. मेहसाणात पुन्हा घेतलेली चाचणीही झाली यशस्वीबुधवारी गुजरातमधील मेहसाणा ते जेएनपीटी बंदरापर्यंत डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डबल स्टॅकड् ड्वार्फ कंटेनरच्या पाच वॅगनसह ट्रेन सकाळी ११.३० वाजता जेएनपीटी बंदरात दाखल झाली व दुपारी १ वाजता परत रवाना झाली. या वेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच जेएनपीटीचे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी राजन गुरव, नितीन बोरवणकर, संजीव कुमार व इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.