शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

काेराेनाची लस घेताना घाबरून जाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:41 IST

तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला : रक्तदाब, मधुमेह, ॲलर्जी असली तरी आजाराबाबत संबंधितांना अवगत करावे

आविष्कार देसाईलाेकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यामध्ये काेराेना लसीकरण जाेमाने सुरू आहे. रक्तदाब, मधुमेह अथवा ॲलर्जी असली तरी काेराेना लस घेताना घाबरून जाऊ नका, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. फक्त आपल्या आजाराबाबत डाॅक्टरांना अवगत करावे, असेही त्यांनी सुचविले आहे.

रायगड जिल्ह्यात काेरोनाचा रुग्ण ८ मार्च २०२० राेजी सापडला हाेता. त्याला आता तब्बल एक वर्षाचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे. एक वर्षाच्या आतच भारतामध्ये कोरोनावरील काेव्हिशिल्ड आणि काेव्हॅक्सिन अशा दाेन लसींची निर्मिती करण्यात यश आले आहे. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी, फ्रंट वर्कर, पाेलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना काेराेनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यांना दाेन टप्प्यात लस देण्याची सुविधा संबंधित सरकारी रुग्णालय, प्राथमिक आराेग्य केंद्रांसह काही खासगी रुग्णालयांमध्ये देण्यात येत आहे. आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्याची व्यवस्था सरकार आणि प्रशासनाने करून दिलेली आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिकांमध्ये रक्तदाब, मधुमेह, ॲलर्जी यासारखे विकार आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रक्तदाब असाे अथवा मधुमेह किंवा अन्य काेणता आजार, लस सुरक्षित असल्याने ती घ्यावी, असा सल्ला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. लस घेताना संबंधित डाॅक्टरांना असणाऱ्या समस्या आणि विकार यांची माहिती आवर्जून द्या, असेही सांगायला तज्ज्ञ डाॅक्टर विसरले नाहीत. तसे केल्याने काही रिॲक्शन झालेच तर संबंधित डाॅक्टरांना उपचार करणे साेपे जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

थंडी, ताप आला तरी काळजी करू नका  लसीकरण झाल्यावर थंडी, ताप आला तरी अजिबात घाबरून जाऊ नये. लसीकरणात जी औषधे डाॅक्टरांनी दिली आहेत, ती त्यांनी वेळेत घ्यावीत. सर्वांनाच ताप येत नाही. त्यामुळे निश्चिंत राहावे, असे आवाहन आराेग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे.

काेराेना लस सुरक्षित आहे. ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी लस घेतल्यास काेणताही त्रास हाेणार नाही. लस घेण्याआधी संबंधित डाॅक्टरांना आपल्या आजाराबाबत आणि नियमित सुरू असलेल्या औषधांबाबत अवगत करून देणे गरजेचे आहे.- डाॅ. राजीव तांबाळे, फिजिशियन

काेराेना सलीचा आणि ॲलर्जीचा काहीच संबंध नाही. काही रुग्णांना आम्ही स्टेराॅइडची औषध देतो. त्यानंतर काही रुग्ण स्वतःच्या मनाने गाेळ्या सुरूच ठेवतात. याची कल्पना त्यांनी लसीकरणाच्या वेळी संबंधित डाॅक्टरांना सांगणे गरजेचे आहे. लस घेताना काेणतीच भीती बाळगू नका.- डाॅ. किरण नाबर, त्वचाराेग तज्ज्ञ 

रक्तदाब असणाऱ्यांनी आपली औषधे सुरूच ठेवावीत. लस घेतल्याने त्यांना त्याचा काहीच त्रास हाेणार नाही. मात्र, लस घेतल्यानंतर सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे म्हणजेच मास्क लावणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर राखणे याचे काटेकाेरपणे पालन करणे गरजेचे आहे.- डाॅ. प्रशांत जन्नावर,  ह्रदयराेग तज्ज्ञ 

ज्यांना किडनीचा विकार आहे आणि ज्यांचे डायलिसिस सुरू आहे, त्यांनी काळजी घ्यावी. रुग्णांनी डायलिसिसच्या दिवशी लस घेऊ नये. अन्य वेळी लस सुरक्षित आहे.- विनीत शिंदे, फिजिशियन

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRaigadरायगड