शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो उभारणीत आर्थिक सहभाग नकोच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:36 IST

पनवेल पालिकेच्या महासभेत निर्णय; नवी मुंबई  मेट्रो प्रकल्पाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प कॉरिडॉर १, तळोजे एमआयडीसी ते खांदेश्वर तसेच पेंधर ते तळोजे एमआयडीसी या मेट्रोच्या तीन मार्गिकांच्या नियोजनाच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने सिडकोला सुमारे २०० कोटींचा आर्थिक सहभाग देण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव पनवेल महानगरपालिकेच्या महासभेपुढे मंजुरीसाठी आला होता. आर्थिक सहभागावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध केला.

या प्रस्तावावर चर्चा करताना पुन्हा एकदा सभागृहात सिडकोच्या कारभारावर नाराजीचा सूर उमटल्याचे पाहावयास मिळाले. सिडको नोडमधील नागरिकांना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पाचे नियोजन करताना पालिका अस्तित्वात नसल्याने सिडको महामंडळानेच याकरिता खर्च उचलणे गरजेचे असल्याने एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक अनिल भगत, उपमहापौर जगदीश गायकवाड, अरविंद म्हात्रे, नितीन पाटील, रवींद्र भगत आदींनी या प्रस्तावावर चर्चा केली. एमएमआरडीएमधील दळणवळण व्यवस्था तसेच वाहतूककोंडी संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये यासंदर्भात विषय चर्चेला आला होता. नियोजन प्राधिकरण सिडको महामंडळ असल्याने यासंदर्भात खर्चाची जबाबदारी सिडकोची असल्याने तशा प्रकारे ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली. याव्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरामुक्त पनवेल शहराला ३ तारांकित मानांकनास मान्यता देण्यात आली. मात्र सत्ताधारी व विरोधक दोघांनीही कंत्राटदारामार्फत योग्यरीत्या कचऱ्याचे नियोजन केले जात नसल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. उपमहापौर जगदीश गायकवाड, विक्रांत पाटील आदींसह इतर सदस्यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. पालिका हद्दीतील अडीवली येथील सर्व्हे नंबर ८९/अ ही जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळण्याबाबत व शासन निर्देशानुसार विकसित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर, अरविंद म्हात्रे यांनी या प्रस्तावाला विरोध केला तर भाजप नगरसेवक नितीन पाटील यांनी या प्रस्तावाच्या बाजूने आपले मत व्यक्त करीत पालिकेला स्वतःच्या मालकीच्या डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता असल्याचे सांगितले.

ऑनलाइन सभेमुळे गोंधळ कायम कोविडमुळे शासनाच्या आदेशानुसार ऑनलाइन महासभा घेण्यात येत आहे. मात्र ऑनलाइन सभेमध्ये तांत्रिक कारणामुळे येणारे व्यत्यय, सर्व सदस्यांना आपली बाजू योग्यरीत्या मांडता येत नसल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत पुढील वेळेस प्रत्यक्ष (ऑफलाइन) सभेच्या आयोजनाची मागणी केली. 

टॅग्स :Raigadरायगड