शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानची अळंबी खाद्यप्रेमींना देणगी

By admin | Updated: June 13, 2017 02:57 IST

मातीचा गंध, दाट धुके याबरोबर जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य. पावसात जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये ही अळंबी उगवते.

नेरळ : मातीचा गंध, दाट धुके याबरोबर जंगलात उगवणारी अळंबी हे माथेरानच्या पहिल्या पावसाचे वैशिष्ट्य. पावसात जंगलात पडलेल्या पालापाचोळ्यामध्ये ही अळंबी उगवते. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या अत्यंत छोट्या छत्रीच्या आकाराच्या अळंबी खाद्यप्रेमी मोठ्या चवीने खातात. आता माथेरानच्या जंगलात ठिकठिकाणी अळंबी उगवली असून सकाळी जंगलात जाऊन अळंबी आणणे हा माथेरानकरांचा दिनक्रम अजून दोन आठवडे चालेल. तज्ज्ञांच्या मते अळंबी ही हरितद्रव्य विरहित फळधारणा करणारी बुरशी आहे. अळंबीस भूछत्र असेही म्हणतात. पुरातन काळापासून संस्कृतमध्ये कुसूंप आणि पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आढळतो. अळंबीविषयी कुत्र्याची छत्री अशी चुकीची कल्पना अजूनही आहे. अळंबी औषधीयुक्त आहार असून निसर्गाकडून मिळालेली देणगी मानली जाते. पावसाळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, कुजणाऱ्या पालापाचोळ्यावर, झाडाच्या बुंध्याला अळंबी उगवते. अळंबीचे नानाविध प्रकार आहेत. विषारी अळंबी देखील आढळून येते. माथेरानच्या जंगलात पावसाळ्याच्या पहिल्या हंगामात आढळणारी अळंबी म्हणजे पर्वणीच असते. अळंबी उगवण्याची प्रकिया सुरु होताना बारीक तुरा असतो नंतर त्याचे अंडी तयार होतात आणि नंतरची प्रक्रि या म्हणजे अळंबीचे बारीक कळ्यांमध्ये होणारे रूपांतर. एकदा अळंबी खाल्ली तो पुढच्यावर्षी हमखास त्याची वाट पाहतो. मुंबईतील अनेक माथेरानकरांना ही अळंबी आवर्जून पाठवली केली जाते, असे वनसंरक्षक समिती सदस्य प्रवीण सकपाळ यांनी सांगितले.